भारतात सर्वाधिक खाल्ले जाणारे लोकप्रिय 7 खाद्यपदार्थ परदेशात पूर्णपणे ‘बॅन’; खाल्ले तर थेट शिक्षीच, कारण वाचून आश्चर्य वाटेल

भारतात सर्वाधिक खाल्ले जाणारे लोकप्रिय 7 खाद्यपदार्थ परदेशात पूर्णपणे ‘बॅन’; खाल्ले तर थेट शिक्षीच, कारण वाचून आश्चर्य वाटेल

भारतीय लोक खाण्या-पिण्याचे खूप शौकीन असतात. आणि आपण जेव्हा जेव्हा खाद्यसंस्कृतीचा विचार करतो तेव्हा सर्वात आधी भारताचं नाव समोर येत. कारण भारतात जेवढ्या धर्माचे लोक राहतात तेवढ्याच खाद्यसंस्कृती देखील विविध पाहायला मिळतात. आपल्या देशात लाखो प्रकारचे खाद्यपदार्थ तयार होत असतात.ते खूप आवडीने खाल्लेही जातात. पण हे अनेकांना माहित असेल कि भारतीतील सर्वात जास्त खाल्ले जाणारे आणि लोकप्रिय असणारे पदार्थ परदेशात मात्र बॅन करण्यात आले आहेत. चला, जाणून घेऊया कोणते पदार्थ आहेत आणि त्या पदार्थांवर बंदी का आहे ते?

समोसा

भारत, पाकिस्तान, बांगलादेश आणि नेपाळ सारख्या अनेक देशांमधील लोकांना समोसा आवडतो. आपण भारतीय समोसा चहासोबत नाश्त्यासाठी आणि स्कॅन्स म्हणून कधीही खातो . पण आफ्रिकन देश सोमालियामध्ये समोसा खाण्यास बंदी आहे. या देशात समोसा बनवण्यासाठी, खरेदी करण्यासाठी आणि खाण्यासाठी लोकांना थेट शिक्षा दिली जाते. यामागील कारण म्हणजे त्याचा त्रिकोणी आकार. येथे, अल शबाद गटाचे लोक त्रिकोणी आकाराला ख्रिश्चन धर्माचे प्रतीक मानतात. काही मीडिया रिपोर्ट्समध्ये असेही म्हटले आहे की येथे समोशामध्ये कुजलेले मांस भरले जात होते, ज्यामुळे त्यावर बंदी घालण्यात आली.

केचप

बर्गर असो, पिझ्झा असो किंवा फ्रेंच फ्राईज असो, कोणतेही स्कॅन्स केचपशिवाय पूर्ण होत नाही. जगभरात केचप मोठ्या आवडीने खाल्लं जातं. भारतातही लोक ते समोसे, बटाट्याचे पॅटीज आणि पकोड्यांसोबत खातात. लहान मुलांना तर त्याची चव इतकी आवडते की त्यांचे जेवण त्याशिवाय पूर्ण होत नाही. पण तुम्हाला माहिती आहे का की फ्रेंच सरकारने केचपवर बंदी घातली आहे? यामागील कारण म्हणजे तेथील किशोरवयीन मुले ते जास्त प्रमाणात खात होती.

च्यवनप्राश

भारतात, लोक हिवाळ्यात रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी च्यवनप्राश खातात. त्याच्या औषधी गुणधर्मांमुळे लोकांना ते खायला आवडतं. पण 2005 मध्ये कॅनडामध्ये च्यवनप्राशवर बंदी घालण्यात आली होती. बंदी घालण्यामागील कारण म्हणजे त्यात मोठ्या प्रमाणात शिसे आणि पारा असतो असं म्हटलं गेलं.

तूप

भारतात तूप म्हणजे हेल्थी पदार्थ जो प्रत्येकाच्या घरात असतोच असतो. एवढंच काय तर, मिठाई, पराठे, रोटी, डाळ, भाज्या इत्यादी जवळजवळ प्रत्येक पदार्थात तूप वापरले जाते. लोक पराठे आणि रोटीवर देखील भरपूर तूप घालतात. पण अमेरिकेत तूपावर बंदी आहे. तिथल्या अन्न आणि औषध प्रशासनाचा असा विश्वास आहे की तूप खाल्ल्याने हृदयविकाराचा झटका, रक्तदाब आणि लठ्ठपणा येऊ शकतो. म्हणून तुप खाण्यास बंदी घालण्यात आली आहे.

च्युइंग गम

अनेक लोकांना च्युइंग गम चघळताना पाहिले असेल. काही लोक ते स्टाईल म्हणून खातात तर काही जण डबलचीनची एक्सरसाईज म्हणून. पण 1992 पासून सिंगापूरमध्ये च्युइंग गमवर बंदी घालण्यात आली आहे. खरंतर, येथील बरेच लोक च्युइंग गम खाल्ल्यानंतर कुठेही थुंकत असत, ज्यामुळे तिथे घाण पसरत असे. सिंगापूर त्याच्या स्वच्छतेसाठी खूप प्रसिद्ध आहे, म्हणून लोक ते कुठेही फेकू किंवा चिकटवू नये म्हणून येथे च्युइंग गमवर बंदी घालण्यात आली आहे.

खसखस

भारतात, खसखसचा वापर अनेक गोष्टींमध्ये केला जातो.अनेकदा गोड पदार्थ बनवायला तर खमंग चव लागण्यासाठी खसखस वापरतो. परंतु सिंगापूर, तैवान, सौदी अरेबिया आणि युएई सारख्या देशांमध्ये त्यावर बंदी आहे कारण त्यात मॉर्फिन असतं असं म्हटलं आहे.

 

 

 

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

स्वयंपाकघरात असलेल्या या गोष्टी ‘सायलेंट किलर’;  शरीरात विषासारख्या पसरतात स्वयंपाकघरात असलेल्या या गोष्टी ‘सायलेंट किलर’; शरीरात विषासारख्या पसरतात
आपल्या स्वयंपाकघरात अशा काही गोष्टी ठेवल्या जातात ज्या अन्नाची चव वाढवतात पण त्या हळूहळू आपल्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतात. त्या...
Ratnagiri News – मुंबई गोवा महामार्गावर केमिकल घेऊन जाणाऱ्या टॅंकरला आग
अमेरिकेत भरधाव कारने 30 जणांना चिरडले, सात जणांची प्रकृती गंभीर
Photo – मुंबईतून कोल्हापूरच्या राजाचे प्रस्थान
Photo – प्रियदर्शनीचा हॉट गुलाबी लूक!
महाकाली ढोकळा खात नाही, मतदारांना आकर्षित करण्याचा मोदींचा प्रयत्न फसलाय; महुआ मोइत्रा यांचा टोला
बनावट नोटा अर्थव्यवस्थेला गंभीर धोका; दिल्ली उच्च न्यायालयाचे महत्वपूर्ण मत