इस्रायलनेही पाकिस्तानची री ओढली, नोबेल शांतता पुरस्कारासाठी डोनाल्ड ट्रम्प यांच्या नावाची शिफारस
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हिंदुस्थान व पाकिस्तानमधील युद्ध मी थांबवले असा दावा अनेकदा केला. इराण व इस्रायल युद्धातही ट्रम्प यांनी मध्यस्थीचा प्रयत्न केला. दरम्यान गेल्या आठवड्यात पाकिस्तानने डोनाल्ड ट्रम्प यांना शांततेचा नोबेल पुरस्कार मिळायला हवा अशी भूमिका मांडली होती. त्यांच्या या मागणीला इस्रायलने देखील पाठिंबा दर्शवला आहे. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी देखील पाकिस्तानची री ओढली.
पाकिस्तानचे लष्करप्रमुख असिम मुनीर यांनी काही दिवसांपूर्वी ट्रम्प यांची भेट घेतली होती. त्यानंतर त्यांनी 2026 चा शांततेचा नोबेल पुरस्कार हा डोनाल्ड ट्रम्प यांना दिला गेला पाहिजे अशी मागणी केली होती. हिंदुस्थान पाकिस्तानमधील युद्ध डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळेच थांबलं असं सांगत मुनीर यांनी त्यांचे नाव नोबेल पुरस्कारासाठी सुचवले होते.
बेंजामिन नेतान्याहू यांनी सोमवारी डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतली. त्यावेळी नेत्यानाहू यांनी ट्रम्प यांच्या शिफारशीचे नामांकन पत्र देखील व्हाईट हाऊस प्रशासनाला दिल्याचे समजते. ”डोनाल्ड ट्रम्प हे नोबेल पुरस्कारासाठी पात्र आहेत. त्यांना तो पुरस्कार मिळाला पाहिजे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List