दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांचे ‘माया महल’ वादात
आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे निवासस्थान शीश महलवर टीका करणाऱ्या भाजपचे खरे रूप आता जनतेसमोर आले आहे. केजरीवाल यांनी शीश महलवर पैशांची उधळपट्टी केल्याचा आरोप भाजप नेत्यांकडून केला जात होता, परंतु आता दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्या माया महल या निवासस्थानावर लाखो रुपयांची उधळपट्टी केली जात असल्याचे समोर आले आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याने 60 लाख रुपयांचे टेंडर जारी केले आहे. यावरून दिल्लीतील विरोध पक्ष असलेल्या आम आदमी पार्टीने आणि काँग्रेसने भाजप व मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांना चांगलेच घेरले आहे.
रेखा गुप्ता यांनी स्वतःसाठी माया महल बनवला आहे. जनतेचा पैसा पाण्यासारखा खर्च केला. 24 एसी, महागडे झुंबर, स्मार्ट टीव्ही, गीजर, फ्रीज, वॉशिंग मशीन, डिश वॉशर, महागडे मायक्रोवेव, 115 दिवे, रिमोट कंट्रोलचे 23 पंखे लावले आहेत, असा आरोप काँग्रेस प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत यांनी केला.
2 टनचे 14 एसी – 7.7 लाख रुपये
5 स्मार्ट टीव्ही – 9.3 लाख रुपये
रंगीबेरंगी लाइट – 6.03 लाख रुपये
14 सीसीटीव्ही कॅमेरे – 5.73 लाख रुपये
23 प्रीमियम पंखे – 1.8 लाख रुपये
डिश वॉशर – 63 हजार रुपये
गॅस स्टोव्ह – 32 हजार रुपये
वॉशिंग मशीन – 77 हजार रुपये
6 गीजर – 91 हजार रुपये
115 डेकोरेटिव्ह लाईट्स – 6.03 लाख रुपये
ओव्हन – 85 हजार रुपये
झुंबर – 1 ते 2 लाख रुपये
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List