Live – आवाज मराठीचा! उद्धव ठाकरे व राज ठाकरे विजयी मेळाव्यास्थळी दाखल

Live – आवाज मराठीचा! उद्धव ठाकरे व राज ठाकरे विजयी मेळाव्यास्थळी दाखल

‘मराठी तितुका मेळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा’ हा आवाज आज मुंबईच्या आसमंतात घुमणार आहे. हिंदी सक्तीवर मराठी शक्तीच्या विजयाचा अभूतपूर्व विजयोत्सव वरळीच्या एनएससीआय डोम येथे होत असून या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून माय मराठीचे हजारो वारकरी वाजतगाजत, गुलाल उधळत, विजय पताका फडकावत मुंबईत दाखल होत आहेत. या मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा एकत्रित एल्गार घुमणार असून मराठीच्या भक्कम एकजुटीसाठी ठाकरे बंधू एकाच व्यासपीठावर येत असल्याने अवघ्या देशाचे लक्ष या मेळाव्याकडे लागले आहे

      • वरळी डोमबाहेरही मराठी प्रेमींची खचाखच गर्दी

      • राज्यगीताला सुरुवात
      • राज ठाकरे विजयी मेळाव्यास्थळी दाखल
      • कट्टर शिवसैनिक असलेला समर्थ दिनेश आदावडे हा चार वर्षांचा चिमुकला विरारवरून मेळाव्याला आला आहे. एक वर्षांचा असल्यापासून तो वडिलांसोबत शिवसेनेच्या प्रत्येक मेळाव्याला जातो. त्याची सायकल भगवी असून त्यावर शिवसेनेची मशाल आणि भगवा झेंडा आहे.

      • उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे मेळाव्यास्थळी दाखल
      • उद्धव ठाकरे व राज ठाकरे मेळाव्यासाठी रवाना
      • राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे व आमदार जितेंद्र आव्हाड मेळाव्यास्थळी दाखल
      • एनएससीआय डोमबाहेर जमलेल्या मराठी प्रेमींनाही कार्यक्रम पाहता यावा यासाठी मोठे एलईडी स्क्रीन लावण्यात आले आहेत.

      • भगवे फेटे व हातात विजयाची गुढी घेऊन मराठी प्रेमी एनएससीआय डोममध्ये दाखल 

      • वाजत गाजत गुलाल उधळत मराठी प्रेमी डोममध्ये दाखल
      • Photo – वरळीतील एनएससीआय डोम खचाखच भरले, मराठीप्रेमींची तुफान गर्दी

      • शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत मेळाव्यास्थळी दाखल
      • एनएससीआय डोमबाहेर मराठीप्रेमींची तुफान गर्दी
      • एनएससीआय डोमममधील मेळाव्याची तयारी पूर्ण

    • वरळीतील एनएससीआय डोममध्ये महाराष्ट्रातून आलेल्या माय मराठीच्या वारकऱ्यांची गर्दी
Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;