कोणत्या देशाला किती टॅरिफ लागणार? ट्रम्प म्हणाले, सोमवारपर्यंत वाट बघा!
अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांचा टॅरिफ लागू करण्याबाबतचा निर्णय पुढे ढकलला होता. आता 9 जुलैला ट्रम्प यांनी दिलेली मुदत संपत आहे. आता 9 जुलैनंतर कोणत्या देशांना किती टरिफ लागणार, याची चर्चा होत आहे. अमेरिकेच्या टॅरिफच्या धोरणामुळे पुन्हा एकदा सर्व जगाची चिंता वाढण्याची शक्यता आहे. त्यातच कोणत्या देशांची व्यापर करार झाला आहे आणि कोणत्या देशांना किती टॅरिफ लावणार, असा प्रश्न विचारल्यावर डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, सोमवारपर्यंत वाट बघा! असे उत्तर देत ट्रम्प यांनी टॅरिफबाबतचा सस्पेन्स वाढवला आहे.
कोणत्या देशावर किती टॅरिफ लावला? हे सोमवारी स्पष्ट होणार आहे. ट्रम्प यांनी 12 देशांना पत्र लिहिले आहे. रॉयटर्सच्या वृत्तानुसार, न्यू जर्सीला जाताना एअर फोर्स वनवरून पत्रकारांशी बोलताना ट्रम्प यांनी टॅरिफबाबत अधिक माहिती देण्यास किंवा टॅरिफ लावलेल्या देशांची नावे सांगण्यास नकार दिला, तसेच यासाठी सोमवारपर्यंत वाट बघा. सोमवारी याबाबतची माहिती दिली जाईल, असे ते म्हणाले. आम्ही लावलेले टॅरिफ ते देश स्वीकारतील किंवा नाकारतील. मात्र, आम्ही टॅरिफ लावला आहे.
टॅरिफ लावलेल्या देशांची नावे सोमवारी उघड केली जातील. आपण काही पत्रांवर स्वाक्षरी केली आहे आणि ती सोमवारी प्रसिद्ध केली जातील. प्रत्येक देशांवर होणार व्यापार आणि इतर संबंधांचा विचार करत वेगवेगळे शुल्क लादण्यात आले आहे. टॅरिफ आणखी जास्त असू शकतात. काही देशांसाठी हे टॅरिफ 70% पर्यंत पोहोचू शकतात आणि बहुतेक नवीन दर1१ ऑगस्टपासून लागू होण्याची अपेक्षा आहे.
अमेरिकेने आधीच दोन देशांसोबत करार केला आहे. तर हिंदुस्थानसोबतचा व्यापार करार ऑटो आणि शेतीबाबतचा टॅरिफ यावर अडकला आहे. मात्र, दोन्ही देश मिनी डील करू शकतात. काही क्षेत्रे वगळता, इतर क्षेत्रांवरील टॅरिफबाबतचा करार पूर्ण होऊ शकतो, अशी माहिती मिळत आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List