श्री विठ्ठल रुक्मिणीला अज्ञात भाविकांकडून सोन्याचा पोषाख भेट, आषाढी एकादशीच्या नित्यपूजेनंतर परिधान करणार

श्री विठ्ठल रुक्मिणीला अज्ञात भाविकांकडून सोन्याचा पोषाख भेट, आषाढी एकादशीच्या नित्यपूजेनंतर परिधान करणार

श्री विठ्ठल रूक्मिणी मातेच्या चरणी नाव न सांगण्याच्या अटीवर दानशूर भाविकाकडून सोन्याचा पोषाख व चांदीने मढविलेले सागवाणी लाकडाचे पाट अर्पण केल्याची माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली.

श्री विठ्ठलासाठी तांबड्या रंगाची वेलवेट अंगी, अंगीच्या गळ्याला 3 पदरी मोत्याची माळ, गळपट्टीला सोन्याची चैन, खांद्याला दोन बाजूबंद, बंधाला मोत्याचे लटकन व सोने, दोन्ही हाताला ब्रेसलेट, प्रमाणित गोल मोत्याचे मणी व यामध्ये कौस्तुक मण्यासारखा मध्यभागी हिरवा मणी तसेच आंबा कलरचा शेला, त्यामध्ये मोत्याच्या सुरमण्या, त्यास सोन्या व मोत्याचे पूर्णपणे वर्क आहे. श्री रूक्मिणीमातेसाठी आंबा कलरची सिल्क पैठणी, सोन्याची ठुसी, मंगलसुत्र, जोडवे, पैजन, बांगड्या, नथ इत्यादी सौभाग्यचं लेणं अर्पण केले आहे. याशिवाय, दोन सागवानी पाट चांदीने मढवून दिले आहेत. श्रींच्या पोषाखासाठी 10 तोळे सोन्याचा वापर करून, त्यासाठी सुमारे 11 लक्ष तसेच चांदीच्या पाटासाठी 4 किलो चांदीचा वापर व त्यासाठी 4 लक्ष रूपयाचा खर्च आला आहे.

सद्यस्थितीत, आषाढी यात्रेचा कालावधी सुरू असल्याने भाविकांची मंदिर परिसर व दर्शनरांगेत मोठ्या प्रमाणात गर्दी आहे. या यात्रेचा मुख्य सोहळा रविवार दिनांक 06 जुलै रोजी संपन्न होत आहे. या दिवशी श्री विठ्ठल रूक्मिणीमातेची नित्यपूजा झाल्यानंतर वरील प्रमाणे सोन्याचा पोषाख श्रीस परिधान करण्यात येणार आहे. संबंधित देणगीदार हे श्री विठ्ठल रूक्मिणीमातेचे निस्सिम भक्त आहेत. यापूर्वी त्यांनी श्रींच्या चरणी चांदीची कळशी भेट दिली होती असे यावेळी व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी सांगीतले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;