Pune news – कुरिअर बॉय नव्हे; तरुणीनेच रचला बनाव, दिशाभूल केल्याने तब्बल 600 पोलीस लागले कामाला

Pune news – कुरिअर बॉय नव्हे; तरुणीनेच रचला बनाव, दिशाभूल केल्याने तब्बल 600 पोलीस लागले कामाला

कुरिअर बॉयने तरुणीच्या अंगावर स्प्रे मारून बेशुद्ध करीत बलात्कार प्रकरणाचा उलगडा झाला असून, संबंधित तरुणीने मित्रासोबत संमतीनेच शरीरसंबंध ठेवल्याची धक्कादायक माहिती तपासात उघड झाली आहे. याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी तरुणाला ताब्यात घेतले आहे.

दरम्यान, पीडितेने पोलिसांची दिशाभूल केल्याचे स्पष्ट झाले आहे. मानसिक स्वास्थ चांगले नसल्यामुळे आपण पोलिसांकडे तक्रार केल्याची कबुली पीडितेने दिल्याची माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी सहआयुक्त रंजनकुमार शर्मा उपस्थित होते.

आरोपी तरुण आणि पीडित तरुणी मागील एक वर्षांपासून मित्र आहेत. 2 जुलैला रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास कुरिअर बॉयने स्प्रे मारून बलात्कार केल्याची तक्रार तरुणीने फिर्यादीत दिली आहे. पोलिसांनी गुन्हे शाखेसह स्थानिक पोलिसांची 10 पथके तैनात केली. सीसीटीव्ही फुटेजनुसार मिळालेला फोटो पीडितेला दाखविला असता, तिने तो आरोपी नसल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी सोसायटीतील 44 फ्लॅटधारकांकडे विचारपूस केली. त्यांनीही आरोपीला कधी पाहिले नसल्याचे सांगितले. दरम्यान, सोसायटीत दोन दिवसांत ज्या कंपनीने वस्तूंची डिलिव्हरी केली, त्या डिलिव्हरी बॉयची माहिती संकलित केली.

800 पोलिसांची फौज दिवसरात्र मेहनत करीत होती. 500 लोकेशनचे सीसीटीव्ही तपासण्यात आले. मिळालेल्या फोटोतील एकजण बाणेर आयटी ऑफिसमधून बाहेर पडताना दिसून आला. त्यानुसार 4 जुलैला दुपारी तीनच्या सुमारास त्याला ताब्यात घेतले. टेक्निकल डेटा तपासला असता, तो आरोपी कोंढव्यातील घटनास्थळी असल्याचे स्पष्ट झाले. चौकशीत त्याने पीडिता माझी मैत्रीण असून, एक वर्षापासून आम्ही संपर्कात असल्याचे सांगितले. तिच्यासोबतचे चॅटही त्याने दाखविले. त्यानंतर पोलिसांनी पीडितेकडे विचारपूस केली असता, मानसिक स्थिती खराब झाल्यामुळे पोलिसांची दिशाभूल केल्याची कबुली तरुणीने दिली आहे.

आरोपी आणि पीडित मागील एक वर्षापासून एकमेकांच्या ओळखीचे आहेत. मुलीचे मानसिक स्वास्थ्य खराब झाल्यामुळेच तिने पोलिसांची दिशाभूल केल्याची प्राथमिक कबुली दिली आहे. याप्रकरणी तिचे समुपदेशन सुरू असून, प्रकरणातील पोलिसांची भूमिका लवकरच स्पष्ट केली जाणार आहे.

अमितेश कुमार, पोलीस आयुक्त, पुणे शहर

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;