महाराष्ट्र, मराठी भाषा, मराठी माणूस याच्यावर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही! राज ठाकरे यांनी ठणकावलं

महाराष्ट्र, मराठी भाषा, मराठी माणूस याच्यावर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही! राज ठाकरे यांनी ठणकावलं

मराठी या एका विषयासाठी सत्तेवरही लाथ मारण्याचे संस्कार झाले असतील तो मराठीसाठी तडजोड करेल काय? बाकी युत्या, आघाड्या होत राहतील पण महाराष्ट्र, मराठी भाषा, मराठी माणूस याच्यावर कोणत्याही परिस्थिती तडजोड होणार नाही, कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही, अशा शब्दात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांना ठणकावलं. आपल्या खास शैलित समाचार घेताना ‘कोणाची माय व्ययली आहे त्याने महाराष्ट्राला हात घालून दाखवावा, मुंबईला हात घालून दाखवावा. मजाक वाटला काय? आम्ही शांत आहोत याचा अर्थ गांडू नाही’, असे राज ठाकरे गरजले.

सन्माननीय उद्धव ठाकरे आणि बाहेर जमलेल्या तमाम बंधू-भगिनी आणि मातांनो…, असे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हणताच वरळी एनएससीआय डोम टाळ्यांचा कडकडाट आणि शिट्यांनी दणाणून उठले. खरंतर आज मोर्चा निघायला पाहिजे होता. मराठी माणूस कसा सर्व बाजूने एकवटतो याचं एक चित्र मोठ्याप्रमाणावर उभं राहिलं असतं. नुसत्या मोर्चाच्या चर्चेनेच माघार घ्यावी लागली. खरं तर आजचाही मेळावा शिवतीर्थावरती मैदानात व्हायला पाहिजे होता. मैदाना ओसंडून वाहिलं असतं. पण पाऊस आहे, असे राज ठाकरे म्हणाले.

मी माझ्या मुलाखतीत एक म्हटलं होतं की ज्याच्यातनं या सगळ्या गोष्टी सुरू झाल्या होत्या. त्यावेळी मी असं म्हटलं होतं की, कोणत्याही वादापेक्षा आणि कुठल्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. आज जवळपास 20 वर्षांनंतर मी आणि उद्धव आम्ही एका व्यासपीठावरती येत आहोत. जे माननीय बाळासाहेबांना जमलं नाही, जे अनेकांना जमलं नाही आम्हाला दोघांना एकत्र आणायचं ते देवेंद्र फडणवीसला जमलं, असा सणसणीत टोला राज ठाकरे यांनी लगावला.

खरंतर आजचा हा मेळावा… मोर्चालाही तीच घोषणा होती आणि आजच्या मेळाव्यालाही तीच घोषणा आहे की कुठलाही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा… माझ्या मराठीकडे माझ्या महाराष्ट्राकडे वेड्या वाकड्या नजरेनं पाहायचं नाही कोणी… खरंतर हा प्रश्नच अनाठायी होता, काही गरज नव्हती. हे कुठून अचानक हिंदीचं आलं काही कळचं नाही. आणि हिंदी कशासाठी? कोणासाठी हिंदी? त्या लहान लहान मुलांवर जबरदस्ती करताय तुम्ही. कोणाला विचायरचं नाही, शिक्षणतज्ज्ञांना विचायरायचं नाही, बस आमची सत्ता आहे, आमचं बहुमत आहे आम्ही लादणार. तुमच्या हातात सत्ता असेल ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे रस्त्यावर. एक पत्र लिहिलं दोन पत्र लिहिली नंतर ते दादा भुसे माझ्याकडे आले. म्हणाले की, आम्ही काय म्हणतोय ते समजून तर घ्या. म्हटलं तुम्ही काय सांगताय ते ऐकून घेईन पण ऐकणार नाही. मराठीच्या विषयामध्ये तुम्ही तिसरी भाषा लादताय. कुठलं त्रिभाषा सूत्र. त्रिभाषा सूत्र ज्यावेळेला आलं ते फक्त केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यामधल्या दुव्यासाठी हे त्रिभाषा सूत्र आणलं. तुम्ही हायकोर्टात जा, सुप्रीम कोर्टात जा इंग्रजीमध्ये सगळ्या गोष्टी होतात, कुठे आहे त्रिभाषा सूत्र? केंद्राच्या शिक्षण धोरणातही नाही. इतर कोणत्या राज्यातही नाही. महाराष्ट्रात प्रयोग करून पाहिला त्यांनी. दक्षिणेतील राज्य हिंग लावून विचारत नाही त्यांना… पण महाराष्ट्र ज्यावेळेला पेटून उठतो त्यावेळी काय घडतं आणि काय होतं हे आज राज्यकर्त्यांना समजलं असेल. त्याशिवाय का माघार घेतली? असा घणाघात राज ठाकरे यांनी केला.

विनाकारण आणलेला विषय होता. उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान, मध्य प्रदेश कोणती तिसरी भाषा आणणार आहेत? खरंतर आणली पाहिजे. गंमत बघा हिंदी भाषिक राज्य आहेत ती आर्थिकदृष्ट्या मागास आणि हिंदी न बोलणारी जी राज्य आहेत ती आर्थिकृष्ट्या प्रगत आणि वर आम्ही हिंदी शिकायचं. यांना हिंदीतून राज्य नाही सांभाळता आली. यांना राज्यांचा विकास करता आला नाही. जे हिंदी बोलत नाही त्या राज्यांमध्ये हिंदी बोलत असलेल्या राज्यांमधून नोकरी धंद्यासाठी लोक इकडे येतायेत. आणि हे म्हणतायेत हिंदी शिका. कोणासाठी शिकायचं? पाचवीनंतर हिंदी चित्रपटसृष्टीत जाणार आहे का मुलगा? कोणासाठी शिकायचं? हिंदी भाषेबद्दल मला वाईट वाटत नाही. भाषा कोणतीही श्रेष्ठच असते, उत्तमच असते. मग ती मराठी, तामीळ, पंजाबी, गुजराती, बंगाली असेल, हिंदी असेल अजून कुठलीही असेल. एक भाषा उभी करायला खूप प्रचंड तपश्चर्या लागते, खूप लोकांची मेहनत असते. एक लिपी उभी करायला खूप प्रचंड ताकद लागते. अशाच भाषा काही उभ्या राहत नसतात. आणि हे भाषेचं नवीन कुठून आणलं. त्या दिवशी अमित शहा म्हणाले, ज्याला इंग्रजी येतं त्याला पुढे जावून लाज वाटेल म्हणे मला इंग्रजी येतं म्हणून. तुम्हाला नाही येत, असे सांगत राज ठाकरे यांनी अमित शहांवर निशाणा साधला.

संपूर्ण हिंद प्रांतावरती १२५ वर्षे मराठ्यांनी राज्य केलं. इतक्या राज्यांवरती आम्ही राज्य केलं. आम्ही मराठी लादली? गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान, पंजाब इतर सगळ्या प्रांतात, अटोकपर्यंत पोहोचले होते मराठा साम्राज्य, आम्ही लादली? हिंदी भाषा दोनशे वर्षांपूर्वीची भाषा आहे. महाराजांच्या काळातही नव्हती. कशासाठी कोणासाठी आणि काय करायचंय नेमकं? यांनी फक्त चाचपडून पाहिलं. मुंबई स्वतंत्र करता येते का? यासाठी आधी थोडसं भाषेला डिवचून बघू. महाराष्ट्र शांत राहिला तर पुढे ते पाऊल टाकू. कोणाची माय व्ययली आहे त्याने महाराष्ट्राला हात घालून दाखवावा, मुंबईला हात घालून दाखवावा. मजाक वाटला काय? आम्ही शांत आहोत याचा अर्थ गांडू नाही आहोत. काही अंगावरती लादायचा प्रयत्न करता, असे म्हणत राज ठाकरे यांनी ठणकावले.

आता माघार घेतली ना. माघार घेतली ना मग त्याचं काय करायचं. मग वेगळ्या ठिकाणी वळवा सगळं प्रकरण. म्हणजे कुठे? ठाकऱ्यांची मुलं इंग्रजीमध्ये शिकली. बरं मग पुढे? म्हणजे दादा भुसे मराठी मीडियममध्ये शिकून शिक्षणमंत्री झाले. देवेंद्र फडणवीस इंग्रजी मीडियममध्ये शिकून मुख्यमंत्री झाले. कुठे काय शिकले याचा काय संबंध? कोणा-कोणाची मुलं परदेशात शिकतायेत याद्या आहेत आमच्याकडे? त्याचं काय करणार आहात तुम्ही? आणि त्याच्यातल्या त्याच्यात मंत्रिमंडळातील एक-एक मंत्र्याचं हिंदी ऐका फेफरं येईल फेफरं… हे असले प्रश्न महाराष्ट्रातच विचारले जातात, असे म्हणत राज ठाकरे यांनी फटकारले.

आता मी तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतो… आम्ही मराठी मीडियममध्ये शिकलो, आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकली, याच्यावर तुम्ही प्रश्न विचारता यांना मराठीचा पुळका कसा? हे इंग्रजी मीडियममध्ये टाकतात. बरं, सन्माननीय माननीय बाळासाहेब ठाकरे आणि माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजी मीडियममध्ये शिकलेले आहेत. या दोघांवरती तुम्ही मराठीबद्दल शंका घेऊ शकता का? असा सवाल करत राज ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांवर हल्ला चढवला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

पीठ मळताना फक्त ही एकच गोष्ट मिसळला; शरीरातील व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता होईल पूर्ण पीठ मळताना फक्त ही एकच गोष्ट मिसळला; शरीरातील व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता होईल पूर्ण
आजकाल अनेकांना व्हिटॅमिन B12 ची कमतरता प्रचंड प्रमाणात जाणवते. त्यासाठी डॉक्टरांचे उपचार, सप्लिमेंट घ्यावे लागतात. पण हे सर्व न करता...
रात्री झोपण्याआधी हे पावरफुल ड्रिंक नक्की प्या; शरीरातील बदल थक्क करतील
वैभव सूर्यवंशीने इंग्लंडच्या गोलंदाजांची धुलाई केली; 52 चेंडूंमध्येच ठोकलं शतक
सिंहासन खाली करो, ठाकरे आ रहे है….! संजय राऊत यांचा सत्ताधाऱ्यांना इशारा
लग्नाला चाललेल्या वऱ्हाडाच्या कारला भीषण अपघात, नवरदेवासह 8 जणांचा मृत्यू
PHOTO – आवाज मराठीचा! विजयी मेळाव्याला तुफान गर्दी
संजू सॅमसन ठरला सर्वात महागडा खेळाडू, आता या लीगमध्ये धमाका करणार!