रात्री हलका आहार घ्यायचाय ? तर या लाईट फूडचा डाएटमध्ये समावेश करा
रात्रीच्या वेळी जड अन्नपदार्थांमुळे अपचन आणि इतर त्रास होत असतो म्हणून रात्रीचा हलका आहार खाने गरजेचे असते. कारण जड अन्नपदार्थ पचन होण्यास जड असतात. त्याने गॅस, एसिडीटी आणि ब्लोटींगची समस्या होऊ शकते. त्यामुळे रात्रीचा हलका आहार करावा असा तज्ज्ञाचे मत आहे. अनेक जण रात्रीचे जेवण करणे टाळतात. परंतू जर भूक लागली तर झोप देखील येत नाही. त्यामुळे रात्रीचा आहार असा असावा ज्याने पोटही भरल्या सारखे वाटेल आणि वजनही वाढणार नाही. तसेच जळजळ आणि एसिटीडी इतर समस्या होणार नाही. चला तर रात्रीचा आहारात कोणत्या पदार्थांचा समावेश करावा हे पाहूयात….
मुगाच्या डाळीचं सूप-
मुग डाळीचे सुप पचायला हलके असते. हे सुप प्रोटीनने पुरेपूर असते. रात्री उशीरा फूड क्रेविंग्स रोखण्यास हे मदत करते. आणि पोटही भरलेले वाटते.
रोस्टेड मखाना-
हा क्रंची नट्स एकदम लो कॅलरी असतो आणि ते खाल्ल्याने पोट भरल्यासारखे वाटते. यामुळे तुम्हाला सटरफटर खाण्याची क्रेविंग्स देखील होत नाही.. आणि तुम्ही आरामात झोपू शकतात.
मसाला पनीर- रात्री मसाला पनीर खाल्ल्याने पोट बराच काळ भरलेले रहाते. यातही प्रोटीनचे प्रमाण चांगले असते. यामुळे तुम्हाला ब्लोटींग देखील होत नाही.
काकडी-पिनट चाट-
जर रात्री काही हलके पदार्थ खाऊन पोट भरायचे असेल तर काकडी – पीनट चाट देखील खाऊ शकता.यात हैल्दी फॅट आणि फायबरचे प्रमाण मोठे असते. तसेच काकडी खाल्ल्याने आपण डायड्रेट देखील रहातो.
व्हेजिटेबल पोहे –
कमी तेलात आणि भरपूर भाज्या टाकून केलेले पोहे देखील डिनरसाठी चांगला पर्याय आहे. हे पोहे खाल्ल्याने जडपणा वाटत नाही आणि पोटही भरलेले रहाते. आणि ते सहज पचन होतात तसेच एनर्जी देखील मिळते.
गरम दूधात हळद टाकून पिणे-
खूप भूक लागली नसली तरी काहीतरी खाण्याची इच्छा रात्रीची होते. तेव्हा गरम दूध आणि हळद टाकून प्यायल्यास बॉडी रिलॅक्स होते. आणि पचन यंत्रणा बूस्ट होते. आणि रात्री चांगली झोप देखील येते.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List