शालेय शिक्षणाची अवनती, जाधव समिती रद्द करा; मराठीच्या व्यापक हितासाठी चळवळीची मागणी

शालेय शिक्षणाची अवनती, जाधव समिती रद्द करा; मराठीच्या व्यापक हितासाठी चळवळीची मागणी

परफॉर्मन्स ग्रेडिंग इंडेक्सचा केंद्र सरकारचा 2022-23 व 23-24चा अहवाल महाराष्ट्र राज्यातील शालेय शिक्षण व्यवस्था वेगाने अवनत कशी होत आहे हे दर्शवत असून 2020-21पर्यंत पहिल्या श्रेणीत असलेले हे राज्य विद्यमान सरकारच्या काळात वेगाने तळाशी घसरले असून ते सातव्या आणि आता आठव्या क्रमांकावर आले आहे. त्यामुळे आता तरी तिसरी भाषा सक्ती करण्यासाठी स्थापलेल्या जाधव समितीचा शासन निर्णय रद्द करावा, अशी मागणी मराठीच्या व्यापक हितासाठी चळवळ, महाराष्ट्र सांस्कृतिक आघाडी, वैश्विक मराठी परिवारच्या वतीने प्रमुख संयोजक डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व शालेय शिक्षण मंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात केली आहे.

राज्याच्या मंत्रिमंडळाने एकूणच शालेय शिक्षण व्यवस्थेचा समग्र आढावा घ्यावा, हे राज्य तळाशी का फेकले गेले, त्याची कारणे शोधण्यासाठी आणि सुधारणेसंदर्भात शिफारशी करण्यासाठी तत्काळ मेंदूविज्ञान तज्ञ, भाषाविज्ञान, बाल मानसशास्त्रज्ञ (साहित्यिक नव्हे), अशांचा समावेश असलेली अशासकीय तज्ञांची समिती स्थापन करावी, अशीही मागणी करण्यात आली आहे.

इंग्रजी विषयाची सक्ती आणि मराठीची राज्याने चालवलेली अवहेलना यांचा परिणाम वेगाने मराठीत मुले नापास होण्यावर झाला आहे. मुलांच्या आकलन क्षमतेचा विचार न करता राबवलेली धोरण शून्यता, शिक्षणाचे स्वयंअर्थसहाय्यीकरण करत सरकारने शालेय शिक्षणातून अंग काढून घेणे, केंद्राचे अभ्यासक्रम आणि पुस्तके जशीच्या तशी लादली जाणे, यामुळे मराठी विषय आणि माध्यम यावर तसेच त्या शाळांमधील शिक्षक, शिक्षण, त्याचा दर्जा आणि गुणवत्ता मिश्र परिणाम करत असून शालेय शिक्षण व्यवस्था रसातळाला घेऊन जात आहे, अशी टीका पत्रात करण्यात आली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

वजन कमी करायचं असेल तर पांढरा भात सोडा, हे 5 प्रकारचे तांदुळ पोषणाने परिपूर्ण वजन कमी करायचं असेल तर पांढरा भात सोडा, हे 5 प्रकारचे तांदुळ पोषणाने परिपूर्ण
पांढऱ्या पारंपारिक तांदळाची खप भारतात जास्त आहे. परंतू अनेक हेल्थ एक्सपर्टच्या मते हा तांदूळ आरोग्यास चांगला नाही त्याचा वापर कमी...
स्वत:ची लघवी पिणे शरीरासाठी खरोखरच फायदेशीर की धोकादायक? डॉक्टर काय सांगतात?
Photo – महाराष्ट्राचे वाघ! तब्बल दोन दशकांनंतर ‘ठाकरे बंधूंची’ गळाभेट
हिंदीची सक्ती कराल तर आमची शक्ती अशी दाखवू की तुम्ही पुन्हा डोकं वर काढणार नाही, उद्धव ठाकरे कडाडले
Video – आम्हाला एकत्र आणण्याचं कुणाला जमलं नाही ते फडणवीसांना जमलं! राज ठाकरेंचा चिमटा
Video – आवाज मराठीचा! उद्धव आणि राज ठाकरे यांचा एकत्रित एल्गार
महाराष्ट्र, मराठी भाषा, मराठी माणूस याच्यावर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही! राज ठाकरे यांनी ठणकावलं