कोल्हापुरात पावसाची उसंत; तरीही पंचगंगेच्या पातळीत वाढ; दिवसभरात 7 फुटांची वाढ; 17 बंधारे पाण्याखाली
कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून पुन्हा एकदा पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. आज जिह्यात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता वर्तवली जात असतानाच, दिवसभर किरकोळ रिपरिप वगळता पावसाने उसंत घेतल्याचे दिसून आले.
दरम्यान, पावसाचा जोर कमी झाला असला तरी धरणांतून कमी-अधिक प्रमाणात सुरू असलेल्या विसर्गामुळे नद्यांच्या पाणीपातळीत मात्र संथगतीने वाढ सुरूच आहे. काल सायंकाळपासून आज दुपारपर्यंत पंचगंगा पाणीपातळीत सहा ते सात फुटांची वाढ झाली. दुपारी बाराच्या सुमारास 26 फुटांवर असलेली पाणीपातळी सायंकाळपर्यंत स्थिर होती. तर काल रात्री 19 बंधारे पाण्याखाली गेले होते. आज दुपारपर्यंत दोन बंधाऱयांवरील पाणी ओसरल्याचे दिसून आले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List