नॉनस्टिक पॅन वापरताना ‘ही’ चूक करू नका, नाहीतर आरोग्यावर होईल घातक परिणाम

नॉनस्टिक पॅन वापरताना ‘ही’ चूक करू नका, नाहीतर आरोग्यावर होईल घातक परिणाम

आजच्या धावपळीच्या जीवनात स्वयंपाकात वेळ आणि श्रम वाचवण्यासाठी नॉनस्टिक भांडी मोठ्या प्रमाणात वापरली जात आहेत. कमी तेलात झटपट शिजणारे पदार्थ आणि स्वच्छतेसाठी सोपे असणारी ही भांडी आधुनिक किचनमध्ये अपरिहार्य बनली आहेत. मात्र, याच्या योग्य वापराविषयी पुरेशी माहिती नसल्याने अनेकदा आरोग्यास धोका निर्माण होतो. विशेषतः नॉनस्टिक पॅनमध्ये स्टीलचा चमचा वापरण्याची चुकीची सवय आपल्या कुटुंबाच्या आरोग्यासाठी गंभीर संकट ओढवू शकते.

नॉनस्टिक कोटिंगचा धोका

नॉनस्टिक पॅनच्या पृष्ठभागावर टेफलॉनसारखे एक विशेष कोटिंग असते, जे पदार्थ भांड्याला चिकटू न देता कमी तेलात शिजण्यास मदत करते. मात्र या कोटिंगला खूप नाजूक रचना असते. यावर स्टीलचे चमचे, फोर्क किंवा हाडाचा वापर केल्यास ही कोटिंग सहज खरडली जाते. कोटिंग उखडल्यास त्यातील रसायने अन्नात मिसळण्याची शक्यता वाढते आणि यामुळे आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो.

स्टीलचा चमच्याचा दुष्परिणाम

जेव्हा स्टीलच्या चमच्याने नॉनस्टिक पॅनमध्ये ढवळले जाते, तेव्हा कोटिंगचे सुक्ष्म कण अन्नात मिसळतात. यामध्ये प्रामुख्याने पर्फ्लुओरोऑक्टॅनोइक अ‍ॅसिड (PFOA) नावाचा रासायनिक पदार्थ असतो, जो दीर्घकाळात केंसर, थायरॉईड समस्या, यकृतविकार आणि हृदयविकाराचा धोका वाढवू शकतो. विशेषतः लहान मुलं आणि वृद्ध व्यक्तींसाठी याचा धोका अधिक गंभीर असतो.

तापमानाचे नियंत्रणही आवश्यक

नॉनस्टिक भांडी अधिक तापमानावर गरम केल्यासदेखील धोकादायक वायू तयार होतात. 260 अंश सेल्सियसपेक्षा जास्त तापमानावर टेफलॉन कोटिंगचे विघटन सुरू होते आणि त्यातून विषारी धूर तयार होतो. दीर्घकाळ याचा संपर्क आरोग्यासाठी अत्यंत घातक ठरू शकतो.

कोणती काळजी घ्यावी?

नॉनस्टिक पॅनचा सुरक्षित वापर करण्यासाठी काही गोष्टींचे विशेषतः भान ठेवणे गरजेचे आहे:

* स्टीलऐवजी सिलिकॉन, लाकूड किंवा नायलॉनच्या चमच्यांचा वापर करा.

* कमी तापमानावरच नॉनस्टिक पॅन गरम करा.

* कोटिंग खराब झाल्यास पॅन त्वरित बदलून नवा घ्या.

* डिशवॉशर आणि स्क्रबर ऐवजी सौम्य साबण आणि हाताने तवा स्वच्छता करा.

* विकत घेत्या वेळेस तव्याचे कोटींग नीट तपासा.

नॉनस्टिक तव्याकरता चमचा विकत घेताना घ्या ही काळजी

1. सिलिकॉन, नायलॉन, वुडन (लाकडी), किंवा बॅम्बू या मटेरियलचे चमचे नॉनस्टिक तव्याकरता सर्वोत्तम असतात.

2. स्टील किंवा लोखंडी चमचे टाळा

3. चमच्याचे टोक किंवा बाजू धारदार नसाव्यात, यामुळे तव्यावर ओरखडे पडणार नाहीत.

4. उच्च तापमान सहन करणारे सिलिकॉन चमचे घ्या (कमीत कमी 200°C पर्यंत).

5. ब्रँडेड कंपन्यांचेच प्रॉडक्ट घ्या, स्वस्त पर्याय टाळा कारण ते लवकर खराब होतात.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;