World Kidney Day | शरीरात ही लक्षणे दिसत असतील तर व्हा सावध कारण थेट किडनीशी संबंध, जाणून घ्या

World Kidney Day | शरीरात ही लक्षणे दिसत असतील तर व्हा सावध कारण थेट किडनीशी संबंध, जाणून घ्या

मुंबई : जेव्हा मूत्रपिंडाची कार्यक्षमता कमी होते तेव्हा मूत्रपिंडाचा आजार होतो. मूत्रपिंडाच्या कार्यक्षमतेवर परिणाम झाल्यास रक्तातील अनावश्यक घटक वाढू शकतात. उच्च रक्तदाब, मधुमेह, अनुवांशिक घटक आणि ठराविक संक्रमणामुळे मूत्रपिंडाचे आजार होऊ शकतात. काही औषधे मोठ्या डोसमध्ये किंवा दीर्घ कालावधीसाठी घेतल्यास मूत्रपिंडाचे नुकसान होऊ शकते.  नियमित व्यायाम, वजन नियंत्रित राखणे, शरीर हायड्रेटेड राखणे आणि वेदनाशामक औषधांचा वापर टाळणे हे मूत्रपिंडाचा आजार होण्याचा धोका कमी करण्याचे सर्वोत्तम मार्ग आहेत. याबाबत डॉ. अमित लंगोटे यांनी सविस्तर माहिती दिली आहे.

मूत्रपिंडाच्या आजाराची अशी लक्षणे ज्याकडे दुर्लक्ष करू नये

मूत्रपिंडास सूज येणे, एनोरेक्सिया आणि वजन कमी होणे तसेच हात, पाय, टाचा किंवा चेहऱ्यावर सूज येणे हे मूत्रपिंड योग्यरित्या कार्य करत नसल्याची लक्षणे आहेत. ॲनिमिया सारखी स्थिती जी लोहाची कमतरता दर्शवते, ज्यामुळे थकवा, अशक्तपणा सारखी लक्षणे दिसून येतात. एक सामान्य लक्षण म्हणजे मूत्रविसर्जन प्रक्रियेत होणारे बदल, जसे की वारंवार लघवीस जाणे किंवा लघवी करण्यास त्रास होणे.

संपूर्ण शरीरावर सतत खाज सुटणे याकडे अनेकदा दुर्लक्ष केले जाते. मूत्रपिंडाचे कार्य बिघडल्यामुळे रक्तामध्ये टाकाऊ पदार्थ तयार होतात तेव्हा अशी स्थिती उद्भवू शकते. उच्च रक्तदाब हे मूत्रपिंडाच्या आजाराचे कारण आणि लक्षण असू शकते, ज्यामुळे वेळीच निदान होण्यासाठी नियमित रक्तदाबाचे निरीक्षण करणे गरजेचे आहे. लघवीच्या रंगात बदल किंवा लघवीसा फेस येणे या असामान्य बदलांकडे लक्ष देणे गरजेचे आहे.या सूक्ष्म लक्षणांबद्दल जागरुक राहणे आणि वैद्यकीय सल्ला घेणे गरजेचे आहे.

मूत्रपिंडाच्या आजाराचे निदान करताना, वेळीच निदान करणे आवश्यक आहे. रक्त चाचण्या, मूत्र चाचण्या आणि इमेजिंग चाचण्या मूत्रपिंडाच्या कार्याचे मूल्यांकन करतात आणि त्यासंबंधी विकृती ओळखतात. किडनीच्या आजारावर अत्याधुनिक एआय टेक्नोलॅाजी फायदेशीर ठरत आहे. उपचारांच्या दृष्टीने, किडनीच्या आजाराचे मूळ कारण शोधणे महत्त्वाचे आहे. उच्च रक्तदाब नियंत्रित करणे, मधुमेह नियंत्रित करणे किंवा मूत्रपिंडास हानिकारक स्वयंप्रतिकार स्थितीचा शोध घेणे आवश्यक आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;