Raisins Benefits : हे आहेत मनुक्याचे प्रकार, जाणून घ्या कोणत्या समस्यांवर कोणते मनुके खावेत

Raisins Benefits : हे आहेत मनुक्याचे प्रकार, जाणून घ्या कोणत्या समस्यांवर कोणते मनुके खावेत

Raisins Benefits : मनुका खाण्याचे अनेक फायदे आहेत. त्यामध्ये विविध प्रकारचे गुणधर्म आढळतात. लोहाची कमतरता असेल तर मनुका खाण्याचा सल्ला दिला जातो. पोटाशी संबंधित काही समस्या असतील तरी देखील मनुका खाण्याचा सल्ला दिला जातो. मनुक्यात फायबर आणि काही वेगळ्या जीवनसत्त्वांमुळे तुम्ही ते वेगवेगळ्या परिस्थितीत खाऊ शकता.

1. काळा मनुका

काळा मनुका हा सामान्यतः सर्व घरांमध्ये असतो. हे द्राक्षांपासून तयार केले जातात. सुकल्यानंतर त्याचा रंग गडद होतो. जे खाल्ल्याने केस गळत नाहीत. आपले आतडे स्वच्छ करते आणि त्वचेचे आरोग्य देखील सुधारते.

2. हिरव्या मनुका

हिरवे मनुके पातळ असतात. आकाराने देखील ते लांब असतात. गडद हिरव्या रंगाचे हे मनुके रसाळ असतात. यात फायबर आणि पोषक तत्व भरपूर असतात . जे हृदयासाठी चांगले असतात.  ॲनिमियाला प्रतिबंध करण्याचं देखील ते काम करतात. पचनास देखील मदत करतात.

3. लाल मनुका

लाल मनुका हा स्वादिष्ट मनुका आहे जो लाल द्राक्षांपासून तयार होतो.  हे आकाराने मोठे असतात. मधुमेहाचा धोका कमी करण्यात ते मदत करतात. ते दातांसाठी देखील चांगले असतात. याशिवाय दृष्टी देखील सुधारते.

4. सोनेरी मनुका

थॉम्पसन सीडलेस द्राक्षांपासून खास तयार केलेल्या तुर्की हिरव्या द्राक्षांवरून सुलताना मनुका हे नाव देण्यात आले आहे. हा मनुका रक्तातील साखर नियंत्रित करतो. याशिवाय जळजळ कमी करतो. पचनास देखील मदत करतो.

मनुक्याचे अनेक प्रकार आहेत. फनुका हा फार गोड नसतो. काळ्या रंगाच्या कोरिंथ द्राक्षांपासून तयार केलेले मनुका खाल्ल्याने घसा खवखवणे बंद होते. याशिवाय रोगप्रतिकारक शक्ती देखील वाढते. रक्तदाब कमी होतो.

मनुका म्हणजे वाळलेली द्राक्षे असतात. जी द्राक्ष्यापेक्षा आकाराने लहान असतात. मनुका नैसर्गिकरित्या महिलांच्या आरोग्यासाठी खूप चांगले असतात. यामुळे बद्धकोष्ठता दूर होते आणि हाडे देखील मजबूत होतात.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;