pomegranate Benefits : डाळिंब खाण्याचे फायदे मोठे, पण अशा लोकांनी करु नये सेवन

pomegranate Benefits : डाळिंब खाण्याचे फायदे मोठे, पण अशा लोकांनी करु नये सेवन

आपल्या आरोग्यासाठी फळे ही महत्त्वाची मानली जातात. जी लोकं फळे खातात ती लवकर आजारी पडत नाहीत. अनेक फळांमध्ये महत्त्वाचे गुणधर्म असतात. असेच एक फळ म्हणजे डाळिंब. हे फळ खूरच चविष्ट आणि गोड आहे. जे अनेक आजारांवरही फायदेशीर आहे. अशक्तपणा दूर करण्यासाठी डॉक्टर डाळिंब खाण्याचा सल्ला देतात. डाळिंब या फळात व्हिटॅमिन सी आणि बी असते. यामध्ये मॅग्नेशियम, पोटॅशियम, फॉस्फरस, सेलेनियम आणि झिंक मुबलक प्रमाणात असते. डाळिंब खाण्याचे जसे फायदे आहेत तसे काही तोटे देखील आहेत. जाणून घेऊया डांळिंबचे फायदे आणि तोटे.

डाळिंबमध्ये अँटिऑक्सिडंट गुणधर्म असतात. डाळिंबाच्या रसामध्ये इतर फळांच्या रसापेक्षा जास्त अँटिऑक्सिडंट असतात. यामुळे पेशींचे नुकसान होण्यापासून संरक्षण होते.

कॅन्सरपासून बचाव करायचा असेल तर तुम्ही डाळिंब खालले पाहिजे. कॅन्सरने त्रस्त लोकांसाठी डाळिंबाचा रस फायदेशीर ठरतो. प्रोस्टेट कर्करोगाच्या पेशी टाळण्यासाठी डाळिंबाच्या रसाचे सेवन केले पाहिजे. त्यामुळे कर्करोगाचा धोकाही कमी होऊ शकतो.

अल्झायमरपासून बचाव करायचा असेल तरी डाळिंब खाल्ले पाहिजे. याच्या बिया अल्झायमर रोगाचा विकास रोखतात आणि व्यक्तीची स्मरणशक्ती मजबूत करतात.

पचनासाठी डाळिंबाचा रस आतड्यांतील जळजळ कमी करून पचन सुधारते. पण जर डायरियाचा त्रास असेल तर त्यांनी डाळिंबाचा रस न खाण्याचा सल्ला दिला जातो.

सांधेदुखी, वेदना आणि इतर प्रकारच्या संधिवातवर डाळिंबाचा रस फायदेशीर आहे. डाळिंबाचा रस हृदयविकारावर देखील फायदेशीर आहे.

रक्तदाबाच्या रुग्णांसाठी देखील डाळिंबाचा रस फायदेशीर मानला जातो. धुमेहाच्या उपचारात डाळिंबाचा रस प्यावा. डाळिंब इंसुलिन आणि रक्तातील साखर कमी करण्यास मदत करते.

डाळिंब खाण्याचे तोटे

कमी रक्तदाब असलेल्या रुग्णांनी डाळिंबाच्या रसाचे सेवन कमी प्रमाणात करावे. डायरियाच्या वेळी देखील डाळिंबाचा रस पिऊ नये.
जर तुम्ही तुमच्या त्वचेवर डाळिंबाचा रस लावलात तर अनेकांना खाज सुटणे, सूज येणे किंवा श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;