म्हातारपणाआधीच हाडं कमकुवत होण्याची भीती ? या पदार्थांनी मिळेल भरपूर कॅल्शिअम आणि व्हिटॅमिन डी

म्हातारपणाआधीच हाडं कमकुवत होण्याची भीती ?  या पदार्थांनी मिळेल भरपूर कॅल्शिअम आणि व्हिटॅमिन डी

मुंबई | 18 मार्च 2024 : आपल्या संपूर्ण शरीराची हालचाल ही सुरळीत व्हावी तसेच कोणत्याही वेदना होऊ नयेत यासाठी आपली हाडं आणि स्नायू मजबूत राहणे महत्वाचे आहे. पूर्वीच्या काळी हाडे कमकुवत होणे, सांधे दुखणे या समस्या ठराविक वयानंतर होत असत आणि या हाडांशी संबंधित आजारांना वृद्धापकाळाचे लक्षण म्हटलं जायचं. पण आहार नीट नसेल तर कोणत्याही वयात हाडं कमकुवत होऊ शकतात. कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे, स्नायू आणि हाडं दुखणे, हाडं कमकुवत होणे आणि तुटणे, हाडं वाकडी होणे यासारख्या समस्या लहान वयातच उद्भवी शकतात. त्यामुळे काही पदार्थांचा आहारात समावेश करणे फायदेशीर ठरते.

कॅल्शियमच्या कमतरतेमुळे शरीरातील हाडं तर कमकुवत होतातच पण त्यासोबतच नखं आणि दातही खराब होऊ लागतात. त्याच वेळी, व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे अशक्तपणा जाणवणे, स्नायूंमध्ये क्रॅम्प येणे, थकवा यासारख्या समस्या उद्भवतात. हे टाळण्यासााठी कोणत्या पदार्थांचा रोजच्या आहाराचा समावेश करावा ते जाणून घेऊया.

दुग्धजन्य पदार्थांमध्ये असतं भरपूर कॅल्शिअम

जेव्हा कॅल्शियमचा विविषय निघतो, तेव्हा डोक्यात सगळ्यात पहिले दूधाचा विचार येतो. हाडं मजबूत होण्यासाठी किंवा पूर्णपणे निरोगी राहण्यासाठी, लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकाने आपल्या दैनंदिन आहारात एक ग्लास दूध पिघेणे आवश्यक आहे. याशिवाय दही आणि चीज यांसारख्या दुग्धजन्य पदार्थांमध्ये कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी मुबलक प्रमाणात असते.

अंडीही उत्तम स्त्रोत

अंडी ही देखील पोषक तत्वांचे पॉवर हाऊस मानली जातात. याच्या पांढऱ्या भागात प्रथिने मुबलक प्रमाणात आढळतात, तसेच त्यात व्हिटॅमिन डी आणि कॅल्शियमचा भरपूर असते. त्यामुळे स्नायू आणि हाडे मजबूत करण्यासाठी आहारात अंड्यांचा समावेश करा.

मशरूम उत्तम पर्याय

व्हिटॅमिन डी ने समृध्द असलेले मशरूम हा शाकाहारी लोकांसाठी एक चांगला पर्याय आहे. त्यात प्रथिने, फॉस्फरस, पोटॅशियम, तांबे, व्हिटॅमिन बी, सी देखील मुबलक प्रमाणात आढळतात.

बदाम

कॅल्शिअमने समृद्ध असलेले बदाम केवळ तुमची हाडं मजबूत करत नाहीत तर ते हृदय आणि मेंदूसाठी देखील खूप फायदेशीर आहेत, कारण त्यात चांगले फॅट्स असतात. रोज सकाळी भिजवलेले बदाम खाणे फायदेशीर मानले जाते.

पालकही उपयोगी

लोह असो वा कॅल्शिअम, पालक ही भाजी अनेक पोषक तत्वांचा खजिना आहे. तुमच्या आहारात पालकाचा समावेश केल्याने अशक्तपणा दूर होतो आणि कमकुवत हाडांपासूनही बचाव होतो. त्यामुळे लहान मुलांनी तसेच मोठ्यांनीही आहारात पालकाचा समावेश करावा.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;