Makhana Benefits : मखाणा खाण्याचे हे अप्रतिम फायदे खूप कमी लोकांना माहितीये

Makhana Benefits : मखाणा खाण्याचे हे अप्रतिम फायदे खूप कमी लोकांना माहितीये

Makhana Health Benefits : मखाणा हे पोषक तत्वांचे भांडार मानले जाते. कारण यामध्ये  प्रथिने, फायबर, कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि लोह मोठ्या प्रमाणात असते.  रोज मखाणा खाण्याचे आरोग्यदायी फायदे तुम्हाला माहित नसतील तर आज जाणून घेऊया. आरोग्य फायदे आहेत.

मखाणा तुम्ही तर रोज सकाळी रिकाम्या पोटी खाल्ल्यास रक्तदाबासारख्या अनेक समस्या दूर होऊ शकतात. हाडे मजबूत करण्यासाठी मखाणा फायदेशीर मानला जातो. याशिवाय रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्याचे काम देखील मखाणा करते.

वजन कमी करण्यासाठी मदत

तुम्हाला जर तुमचे वजन कमी करायचे असेल तर तुम्ही तुमच्या आहारात मखाणाचा समावेश करु शकता. तुम्हाला वजनावर नियंत्रण ठेवायचे असेल तर रोज सकाळी रिकाम्या पोटी मखणा खावे. यामध्ये फॅट आणि कॅलरीज कमी असतात. या शिवाय फायबर भरपूर असते. त्यामुळे पोट जास्त काळ भरलेले राहण्यास मदत होते. यामुळे भूक लागत नाही.

हाडे मजबूत बनवते

मखाणामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असते. जे हाडे मजबूत करण्याचे काम करते. सकाळी रिकाम्या पोटी मखना खाल्ल्याने हाडांच्या संबधित समस्या दूर होऊ शकतात.

मखाणा वाढवते रोगप्रतिकारशक्ती

सकाळी जर तुम्ही रिकाम्या पोटी मखाणा खाल्ला तर तुमची रोगप्रतिकारशक्ती वाढू शकते. मखाणामध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट असतात. ज्या रोगप्रतिकारशक्ती वाढवतात. शरीराला अनेक प्रकारच्या आजारांपासून वाचवण्याचे काम मखाणा करते.

रक्तातील साखरेवर नियंत्रण

सकाळी जर तुम्ही रिकाम्या पोटी मखाणा खालला तर रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत होते. मधुमेहाच्या रुग्णांसाठी मखाणा खूप फायदेशीर मानला जातो. मधुमेहींनी डॉक्टरांच्या सल्ल्यानेच मखाणा खावा.

पचनक्रिया सुधारते

सकाळी रिकाम्या पोटी जर तुम्ही मखाणा खालला तर तुमची पचनक्रिया देखील चांगली राहते. मखाणामध्ये मुबलक प्रमाणात फायबर आढळते, जे पचनक्रिया मजबूत करण्याचे काम करते. सकाळी रिकाम्या पोटी याचे सेवन केल्याने बद्धकोष्ठता, अपचन आणि ऍसिडिटी सारख्या समस्या सहज दूर होतात.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;