Ayushman Bharat Yojana | दूर्धर आजारावर पण इलाज! आयुष्यमान भारत योजनेत या मोठ्या शस्त्रक्रिया होणार

Ayushman Bharat Yojana | दूर्धर आजारावर पण इलाज! आयुष्यमान भारत योजनेत या मोठ्या शस्त्रक्रिया होणार

नवी दिल्ली | 22 February 2024 : कोणत्याही आजारावर उपचारासाठी तुम्ही रुग्णालयात पोहचता, त्यावेळी उपचारासाठी मोठा खर्च येतो. भल्याभल्यांची बचत साफ होते. सर्वसाधारण आजारावर उपचारासाठी मोठा खर्च येतो. गरीबांना तर खासगी रुग्णालयातील उपचार आवाक्यातच नसतो. शासकीय रुग्णालयात त्यांना उपलब्ध उपचार करावा लागतो. त्यासाठीच केंद्र सरकारने आयुष्यमान भारत योजना आणली आहे. त्यामध्ये देशातील कोट्यवधी गोरगरिबांना पाच लाख रुपयांपर्यंतचे उपचार मोफत करता येतात. या योजनेत मोठंमोठ्या शस्त्रक्रिया करता येतात.

अनेक आजारांवर होतो इलाज

आयुष्मान भारत योजनेमध्ये 1760 प्रकारच्या आजारांवर इलाज करण्यात येतो. आता यामध्ये 196 आजार आणि शस्त्रक्रियांचा समावेश करण्यात आला आहे. खासगी रुग्णालयात या आजारावर या योजनेतंर्गत उपचार होत नाही. यामध्ये मोतीबिंदू, सर्जिकल डिलिव्हरी, मलेरिया यासह इतर अनेक आजारांचा समावेश आहे.

या शस्त्रक्रिया करता येतील

आयुष्यमान भारत योजने अंतर्गत कोण-कोणत्या सर्जरी तुम्ही करु शकता, हे तुम्हाला माहिती आहे का? आयुष्यमान भारत योजनेतंर्गत प्रोस्टेट कँसर, डबल वॉल्व रिप्लेसमेंट, कोरोनरी आर्टरी बायपास, पल्मनरी वॉल्व रिप्लेसमेंट, स्कल बेस सर्जरी, टिश्यू एक्सपेंडर, पीडियाट्रिक सर्जरी, रेडिएशन ओंकोलॉजी, न्यूरोसर्जरी, अँजियोप्लास्टी विद स्टेंट या सारख्या शस्त्रक्रिया करता येतात. या योजनेतंर्गत ही सर्जरी तुम्ही खासगी रुग्णालयात पण करु शकता.

80 टक्क्यांहून अधिक रुग्णांवर उपचार

आयुष्यमान भारत योजना लागू झाल्यापासून या योजनेत 80 टक्क्यांहून अधिक रुग्णांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. अनेक रुग्णालये या योजनेतंर्गत उपचार करतात. पण अजूनही अनेक मोठी रुग्णालये आणि इतर इस्पितळात उपचार होत नाही. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना फटका बसतो. त्यांना अधिक खर्च करावा लागतो. खासकरुन आपत्कालीन परिस्थितीत, पैसे नसल्यास मोठी अडचण येते. अनेकदा मोठंमोठी रुग्णालये उपचार घेण्यास नकार देतात. कारण ही रुग्णालये या योजनेत बसत नाहीत. प्रत्येक वर्षी कोट्यवधी लोक या योजनेतंर्गत उपचार घेतात.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;