Benefits of Apple : दररोज सफरचंद खाण्याचे मोठे फायदे, या आजारांपासून राहाल लांब

Benefits of Apple : दररोज सफरचंद खाण्याचे मोठे फायदे, या आजारांपासून राहाल लांब

Benefits of Apple : अनेकांना सफरचंद खायला आवडतं. चवीला गोड असलेलं हे फळ आरोग्यासाठी देखील तितकंच महत्त्वाचं आहे. लाल सफरचंद आरोग्यासाठी खूप चांगले मानले जाते. डॉक्टर देखील रोज एक सफरचंद खाण्याचा सल्ला देत असतात. सफरचंदमध्ये व्हिटॅमिन सी, फायबर, मिनरल्स आणि अँटी-ऑक्सिडंट्स असतात. सफरचंद खाल्ल्याने पोटात भर राहते. ज्यामुळे वजन देखील वाढत नाही. सफरचंदांमध्ये कॅलरीजही चांगल्या प्रमाणात असतात. सफरचंद खाणाऱ्या व्यक्तीला डॉक्टरांकडे जाण्याची गरज भासत असे का म्हटले जाते. चला आज जाणून घेऊयात रोज सफरचंद खाण्याचे आरोग्य फायदे.

वजन कमी करण्यात मदत

रोज सफरचंद खाल्ल्याने पोटात भर राहते ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. सफरचंदमध्ये भरपूर प्रमाणात फायबर आढळते. यामध्ये पाण्याचे प्रमाणही अधिक असते. सफरचंद खाल्ल्याने जेवणावर नियंत्रण ठेवता येते. त्यामुळेच वजन कमी करण्यासाठी ही सफरचंद खाण्याचा सल्ला दिला जातो

हृदयाच्या आरोग्यासाठी चांगले

फायबरने समृद्ध असलेला सफरचंद कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी देखील मदत करतो. यामुळे कोलेस्ट्रॉल कमी होऊन हृदयाचे आरोग्य सुधारते. सफरचंद खाल्ल्याने शरीरात कोलेस्ट्रॉल जमा होत नाही.

पचन चांगले होते

पोटाशी संबंधित समस्या असेल तर त्यांनी सफरचंद खालले पाहिजे. कारण यामध्ये भरपूर फायबर आढळते जे बद्धकोष्ठतेची समस्या दूर करते. सफरचंदमधून शरीराला पेक्टिनचे प्रमाणही चांगले मिळते.

रोगप्रतिकारशक्ती वाढते

सफरचंद खाल्ल्याने प्रतिकारशक्ती देखील वाढते. रोगप्रतिकारक शक्ती सुधारली तर तुम्ही अनेक आजारांपासून लांब राहू शकता. सफरचंद खाणारे व्यक्ती लवकर आजारी पडत नाहीत.

यकृत डिटॉक्स करते

शरीरात असलेले विषारी द्रव्ये यकृत काढण्याचं काम करते. यकृत डिटॉक्स करण्यासाठी सफरचंद खाऊ शकता.

मधुमेह होण्याची शक्यता कमी

तुम्ही जर दररोज एक सफरचंद खालले तर तुम्हाला मधुमेह होण्याची शक्यता देखील कमी होऊन जाते. अभ्यासात असे आढळून आले आहे की, सफरचंद खाल्ल्याने मधुमेहाचा धोका 18% टक्क्यांनी कमी होतो. त्यामुळे तुम्ही तुमच्या आहारात एक सफरचंदाचे सेवन केलेच पाहिजे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;