कोरोनाच्या नव्या साथीत भारत दुसऱ्या क्रमांकावर, JN.1 व्हेरीएंट्सने वाढवले टेन्शन

कोरोनाच्या नव्या साथीत भारत दुसऱ्या क्रमांकावर, JN.1 व्हेरीएंट्सने वाढवले टेन्शन

मुंबई | 12 जानेवारी 2024 : डिसेंबर 2019 मध्ये सुरु झालेल्या कोरोना विषाणूच्या साथीने पुन्हा एकदा जागतिक पातळीवर उसळीवर मारली आहे. या नव्या साथीला JN.1 हा नवा व्हेरिएंट जबाबदार असल्याचे म्हटले जात आहे. चीन, सिंगापूर, अमेरिका, भारतासह हा नवीन व्हेरिएंट आतापर्यंत 41 देशात पसरला आहे. ओमायक्रॉन BA.2.86 व्हेरिएंटमध्ये झालेल्या म्युटेशनमधून तयार झालेला हा कोरोनाचा नवा व्हेरिएंट सर्वाधिक वेगाने पसरणारा आहे. या व्हेरिएंटमुळे अनेक लोकांमध्ये जरी सामान्य लक्षणे दिसत असली तरी देखील त्याचा पसरण्याचा वेग मोठा असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

नव्या विषाणूमुळे सिंगापूर आणि अमेरिकेत कोरोनाची आणखी एक लाट पसरण्याचा धोका तज्ज्ञांनी वर्तविला आहे. कोरोना साथीला आतापर्यंत चार वर्षे पूर्ण झाली आहे. तरी अजूनही ही साथ संपण्याचे नाव घेत नाहीए..साल 2023 कोरोनाच्या संक्रमणाच्या धोका कमी होत आल्याने जागतिक आरोग्य संघटनेने मे महिन्यात या साथीला जागतिक आरोग्यास धोका असल्याच्या यादीतून वगळले होते. परंतू नवीन व्हेरिएंटच्या साथीने जागतिक तज्ज्ञांनी पुन्हा सावधान राहण्याची सूचना करीत आहेत.

संसर्ग आणि मृत्यूत भारताचा क्रमांक दुसरा

कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटमुळे जागतिक पातळीवर झालेल्या संसर्ग आणि मृत्यूमध्ये भारताचा क्रमांक दुसरा आहे. अमेरिकेत कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटमुळे सर्वाधिक संसर्ग आणि मृत्यूची संख्या आहे. अमेरिकेत आतापर्यंत ( 12 जानेवारी 2024 ) कोरोना व्हायरसने 11,04,62,560 नागरिक बाधित झाले आहेत. तर 11,91,815 जणांचा मृत्यू झाला आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर भारत असून आपल्या देशात नव्या विषाणूने कोरोनाच्या एकूण 4,50,20,333 केसेस नोंद झाल्या असून 5,33,409 जणांचा मृत्यू झाला आहे. भारतानंतर फ्रान्स, जर्मनी, ब्राझील, दक्षिण कोरिया, जपान आणि इटलीत सर्वाधिक संसर्ग झाला आहे.

नव्या वेरिएंट JN.1 ने वाढविली चिंता

साल 2023 मध्ये भारतात कोरोना प्रसार खूपच कमी वेगाने होता. परंतू नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये अचानक JN.1 या नवीन प्रकाराने वर्ष संपता संपता डोके वर काढले आहे. भारताच्या 12 राज्यात नवीन व्हेरिएंटचे 11 जानेवारीपर्यंत 827 बाधित आढळले आहेत. JN.1 खूपच वेगाने पसरतो आणि शरीरातील रोगप्रतिकारक शक्तीला तो सहज मात करीत आजारी पाडतो. त्यामुळे त्याच्या या वैशिष्ट्यांमुळे त्याला जागतिक आरोग्य संघटनेने वॅरिएंट ऑफ इंटरेस्ट ( व्हीओआय ) म्हणून नाव ठेवले आहे.

भारतात कोरोनाची दुसरी लाट सर्वात घातक होती. कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटमुळे ती पसरली होती. अल्फा-बिटा व्हेरिएंटच्या पहिल्या लाटेनंतर नोव्हेंबर 2020 ते फेब्रुवारी 2021 दरम्यान कोरोनाच्या प्रकरणात थोडी घसरण झाली. त्यानंतर साल 2021 नंतर आलेल्या डेल्टा विषाणूने आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण आला होता. डेल्टा व्हेरिएंटमुळे श्वासाची समस्या, आयसीयू व्हेंटीलेटरची सर्वाधिक गरज लागली होती. एप्रिल ते जुलैपर्यंत चार महिन्यांच्या अवधीत मोठ्या संख्येने लोकांचे मृत्यू झाले. जगभरात डेल्टा व्हेरिएंटने अडचणीत वाढ केली.

 

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;