Diabetes : साखर खाल्ल्याने नाही होत डायबेटीस, मग कसा होता जाणून घ्या

Diabetes : साखर खाल्ल्याने नाही होत डायबेटीस, मग कसा होता जाणून घ्या

Diabetes reasons : जेव्हा मधुमेहाबाबत बोलले जाते साखरेची चर्चा होतेच.  सामान्य लोकांना असे वाटते की, मधुमेह हा जास्त साखकर खाल्ल्याने होते. पण हा प्रत्यक्षात एक भ्रम आहे. मधुमेह होण्यामागचे मागचे खरे कारण काही वेगळेच आहे. मधुमेह कसा होतो आणि त्याचे कारण काय हे जाणून घेऊयात. मधुमेह हा उच्च रक्तातील साखरेमुळे होणारा आजार असला तरी तो साखर खाल्ल्याने होऊ शकतो का, असा प्रश्न अनेकांना पडतो. पण वस्तुस्थिती अशी आहे की साखर खाल्ल्याने थेट मधुमेह होऊ शकत नाही, परंतु त्यामुळे लठ्ठपणा येऊ शकतो, ज्यामुळे इन्सुलिनचा प्रतिकार होऊ शकतो.

मधुमेह कसा होतो?

जेव्हा शरीर इन्सुलिनवर प्रतिक्रिया देणे थांबवते तेव्हा त्याचे पचण थांबते. त्यामुळे साखर ही थेट रक्तामध्ये जाते. त्यामुळे मधुमेह होतो. म्हणूनच WHO सांगते की, लोकांनी आपल्या दैनंदिन कॅलरीजपैकी 10% पेक्षा जास्त साखरेचा वापर करु नये.

– BMI > 30 सह लठ्ठपणा
– बैठी जीवनशैली
– अनुवांशिकता

या तीन कारणांमुळे मधुमेह होतो. डॉक्टर सांगतात की, जेव्हा स्वादुपिंड पुरेसे इंसुलिन तयार करणे थांबवते किंवा जेव्हा पेशी तयार होणाऱ्या इन्सुलिनला प्रतिरोधक बनतात तेव्हा मधुमेह होतो. जर एखाद्याला मधुमेह झाला असेल तर त्याला साखरेचे सेवन कमी करण्याचा सल्ला दिला जातो. कारण साखरेचे चयापचय करण्यासाठी इंसुलिनला कार्यक्षमतेने कार्य करावे लागते. त्यामुळे मधुमेह झालेल्या रुग्णांमध्ये साखरेचे सेवन केल्यास ग्लुकोजची पातळी वाढते आणि त्यामुळे मधुमेहाशी संबंधित गुंतागुंत होऊ शकते. त्यामुळे केवळ साखरच नाही तर सर्व पदार्थ ज्यामध्ये ग्लुकोज असते, त्यामुळे मधुमेह असलेल्या व्यक्तींनी नियंत्रित पद्धतीने याचे सेवन करावे.

खाल्ल्यानंतर साखरेची पातळी का वाढते?

खाल्ल्यानंतर लगेचच रक्तातील साखरेची पातळी वाढते. कार्बोहायड्रेटयुक्त पदार्थ खाल्ल्यानंतर हे सर्वच लोकांमध्ये होते. पण जेव्हा हे घडते, तेव्हा स्वादुपिंडात दोन महत्त्वाच्या प्रतिक्रिया घडतात. इन्सुलिनचे उत्सर्जन आणि अमायलिन नावाचे संप्रेरक सोडणे.

Amylin अन्नाला लहान आतड्यात जेथे बहुतेक पोषक द्रव्ये शोषली जातात तेथे खूप लवकर पोहोचण्यापासून रोखण्यास मदत करते. बहुतेक वेळा, खाल्ल्यानंतर रक्तातील साखरेमध्ये तात्पुरती वाढ होऊ शकते. ते लक्षातही येत नाहीत.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;