केसांना कंडिशनर आणि सीरम लावताय? तर या दोघांमधील ‘हा’ फरक जाणून घ्या

केसांना कंडिशनर आणि सीरम लावताय? तर या दोघांमधील ‘हा’ फरक जाणून घ्या

वाढत्या प्रदुषणामुळे अनेक आरोग्याच्या समस्या निर्माण होतात. त्याचबरोबर त्वचेच्या समस्या देखील सतावत असतात. अशातच यांचा परिणाम केसांवर सुद्धा होत असतो. त्यामुळे आजकाल बहुतेकजण केस गळण्याच्या समस्यांना त्रासलेले आहेत. यासर्वांमध्ये प्रत्येकालाच आपली केसं दाट आणि मऊ राहावेत असे वाटते. यासाठी लोकं खूप प्रयत्न करतात. ते सर्वात महागडे केसांची निगा राखणारे उत्पादने आणि घरगुती उपचारांचा अवलंब करतात.
त्यातच बरेच लोकं अनेक प्रकारच्या हेअर केअर प्रॉडक्ट वापरून केसांवर उपचार घेतात. यामध्ये कंडिशनर आणि सीरमचा वापर सर्वाधिक केला जातो. केस धुतल्यानंतर लोकं या गोष्टी वापरतात.

केसांची योग्य काळजी घेण्यासाठी फक्त शाम्पू करणे पुरेसे नाही, तर त्यानंतरची काळजी म्हणजेच “कंडिशनिंग” आणि “सीरम” लावणे देखील खूप महत्वाचे आहे. हे दोन्ही प्रॉडक्ट केस मजबूत, मऊ आणि चमकदार बनवण्याचे काम करतात. पण या दोघांमध्ये थोडा फरक आहे. त्याबद्दल आपण आजच्या या लेखात जाणून घेणार आहोत…

कंडिशनर

कंडिशनर हे एक क्रीम किंवा लोशनसारखे केसांचे प्रॉडक्ट आहे जे शॅम्पू केल्यानंतर केसांना लावले जाते. शाम्पू लावल्याने तुमचे केस स्वच्छ होतात, पण त्यामुळे नैसर्गिक तेलही निघून जाते. ज्यामुळे तुमचे केस कोरडे आणि फ्रिजी होतात. अशा वेळेस केसांची ही समस्या सतावू नये यासाठी शाम्पू नंतर कंडिशनर लावल्याने केस मऊ, गुळगुळीत होण्यास मदत होते. कंडिशनर केसांच्या वरच्या थराला कोट करते, त्यामुळे तुमचे केस मऊ व सिल्की होतात.

त्यात कंडिशनर केल्याने केस कमी गुंतात. त्याचबरोबर कंडिशनर लावल्याने शाम्पू केल्यानंतर गमावलेला ओलावा परत आणण्यास मदत करतो. कंडिशनर हे तीव्र सुर्यप्रकाश, धूळ, प्रदूषण आणि हीटिंग टूल्सच्या दुष्परिणामांपासून केसांचे संरक्षण करण्यास मदत करते. शॅम्पू केल्यानंतर केसांमधून जास्तीचे पाणी काढून टाका. थोडे कंडिशनर घ्या आणि केसांना लावा. 2 ते 3 मिनिटांनी केस थंड पाण्याने धुवा.

सीरम

सीरम दिसायला हलका, तेलकट किंवा जेलसारखा असते. जे केसांच्या स्टायलिंगसाठी वापरले जाते. सीरम केसांना चमकदार बनवण्यास मदत करते, फ्रिजीनेसपणा कमी करते आणि केसांना गुळगुळीत करते. सीरम केसांसाठी एक प्रकारचा संरक्षक थर तयार करतो. ज्या लोकांचे केस कोरडे आणि निर्जीव आहेत त्यांच्यासाठी सीरम अधिक फायदेशीर आहे. स्ट्रेटनर, कर्लर किंवा हेअर ड्रायर वापरण्यापूर्वी ते लावल्याने तुमचे केस उष्णतेमुळे खराब होण्यापासून वाचतात. हे केसांचा पोत सुधारण्यास आणि स्प्लिट एंड्स कमी करण्यास मदत करते. केस धुतल्यानंतर आणि सुकल्यानंतर केसांना थोड्या प्रमाणात सीरम लावा. याशिवाय सीरम तुम्ही केसांच्या टोकांना लावा. यामुळे केस वाढण्यास मदत होते.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

‘नागरी उड्डाण’च्या कारभाराची श्वेतपत्रिका काढा, सुप्रिया सुळे यांची मागणी ‘नागरी उड्डाण’च्या कारभाराची श्वेतपत्रिका काढा, सुप्रिया सुळे यांची मागणी
साधा माणूसही स्वस्तात विमान प्रवासात जात असल्याच्या जाहिराती केल्या जातात. मात्र, सरकारचे सुरक्षिततेला प्राधान्य नाही. नागरी उड्डाण क्षेत्रात अनेक वर्षांपासून...
मुंबईत उतरण्याआधी विमानाच्या घिरट्या, टर्ब्युलन्सवेळी प्रवाशांची आरडाओरड! अहमदाबाद घटनेनंतर भिती कायम
जगभरातील विमान वाहतूक क्षेत्राला कोडं पडलंय की एकाचवेळी दोन इंजिन बंद पडली कशी? – संजय राऊत
नवी मुंबई विमानतळाला दिबांचे नाव देण्याचा प्रस्ताव मोदी सरकारने लटकावला, 24 जूनपासून भूमिपुत्र रस्त्यावर उतरणार
नवी मुंबईत 27 कामगारांना वायुबाधा, ‘स्वास्थ्य अ‍ॅग्रो’मध्ये गॅसगळती; 15 महिलांचा समावेश
Air India Plane Crash – नव्या घरात प्रवेश करण्याचे स्वप्न अधुरे
दिव्यातील बेकायदा इमल्यांवर महापालिकेचा बुलडोझर, कोर्टाच्या आदेशानंतर आयुक्तांवर नामुष्की