Health | जिममध्ये वर्क आऊटनंतर ‘या’ तीन चुका कधीच नका करू, शरीराचं होईल भयंकर नुकसान!
हार्ड वर्क आऊट केल्यानंतर अनेकजण बाहेर पडतात. तर काहीजण लगेच आराम करत आपल्या डाईट प्लॅननुसार आहार घेतात. मात्र असं न करत वर्क आऊट झाल्यावर स्ट्रेचिंगही करायला हवं. स्ट्रेचिंगचा कंटाळा करू नका, नाहीतर मसलही लवकर गेन होणार नाहीत आणि वेदना जास्त जाणवतील.
वर्क आऊट झाल्यावर भूक लागलेली असते. परंतु वर्क आऊट करून झाल्यावर लगेचंच काही खाण्याची चूक करू नका. व्यायाम झाल्यावर कमीत कमी अर्ध्या तासानंतर खावं. शरीर थंड झाल्यावर शरीरात अन्न गेल्यावर प्रक्रिया सुरळीत होते.
वर्क आऊट करताना फोन हातात घेत गाणी लावणे किंवा मेसेजला रिप्लाय देणे टाळावं. कारण याचा थेट परिणाम तुमच्या हार्मोन्सवर होत असतो. अशाने तुमचा तणाव वाढू शकतो.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.




Comment List