बनावट दारू म्हणजे नक्की काय? ती विषारी बनते कशी अन् यामुळे लोकांचा मृत्यू का होतो? जाणून घ्या

बनावट दारू म्हणजे नक्की काय? ती विषारी बनते कशी अन् यामुळे लोकांचा मृत्यू का होतो? जाणून घ्या

देशात मोठ्या प्रमाणात मद्यपान केले जाते पण काही गुन्हेगारी मानसिकतेचे लोक बनावट दारू बनवून नफा कमवण्याच्या नादात अनेकांच्या जीवाशी खेळतात. अशा बातम्या आपण नेहमीच ऐकल्या असतील. पण ही बनावट दारू म्हणजे नक्की काय आणि त्याने माणसांचा जीव जाऊ शकतो असं काय मिसळलं जातं त्यात? खरं तर, बनावट दारू बनवण्याचा हा संपूर्ण खेळ मिथाइल अल्कोहोल आणि इथाइल अल्कोहोलबद्दल आहे. इथाइल अल्कोहोल, ज्यापासून दारू बनवली जाते, ती नैसर्गिक प्रक्रियेद्वारे तयार केली जाते, तर मिथाइल अल्कोहोल हे खत उद्योगातील कचरा असतो. मिथाइल अल्कोहोल आपल्या शरीरासाठी खूप धोकादायक असतं.

बनावट दारू नक्की कशी बनवतात? 

एका अहवालानुसार, फक्त 10 मिली मिथाइल अल्कोहोल एखाद्या व्यक्तीला आंधळे करण्यासाठी पुरेसे आहे. त्यामुळे त्याचा जीवही जाऊ शकतो. एका डॉक्टरांच्या मते मिथाइल अल्कोहोल यकृतापर्यंत पोहोचल्यानंतर फॉर्मेल्डिहाइडमध्ये बदलते, जे एक तीव्र विष आहे. ज्यामुळे लोक मरतात. खरंतर, मिथाइल अल्कोहोल आणि इथाइल अल्कोहोल दोन्ही सारखेच दिसतात, त्यांचा वास आणि स्वरूप देखील सारखेच असते.

विषारी दारू बनवतात

प्रयोगशाळेतील चाचणीशिवाय दोन्ही ओळखणे कठीण आहे. कदाचित हेच सर्वात मोठे कारण आहे की दारू बनवणारे, ते इथाइल अल्कोहोल समजून, दारू बनवताना त्यात मिथाइल अल्कोहोल मिसळतात आणि दारू विषारी बनते. दुसरे कारण म्हणजे मिथाइल अल्कोहोल फक्त 6 रुपये प्रति लिटरला उपलब्ध असते, तर इथाइल अल्कोहोल 40 ते 45 रुपये प्रति लिटरला उपलब्ध आहे. अशा परिस्थितीत, काही लोक थोड्याशा नफ्यासाठी लोकांचे जीव धोक्यात घालून विषारी दारू बनवतात, हे कटू सत्य नाकारता येत नाही.

बनावट दारूसाठीचे साहित्य गुजरातमधून येतं

उत्पादन शुल्क अधिकारी वरुण कुमार म्हणतात की मिथाइल अल्कोहोलचा सर्वाधिक पुरवठा गुजरातमधून होतो. ते पातळ बनवण्यासाठी आणि रंग तयार करण्यासाठी वापरले जाते. हे रसायन गुजरातहून मोठ्या टँकरमधून वेगवेगळ्या राज्यांमध्ये आणले जाते. वाटेत ट्रकचालक ते तथाकथित कंत्राटदारांना स्वस्त दरात विकतात आणि मग येथून विषारी दारू बनवण्याचा खेळ सुरू होतो, बनावट दारू प्रकरणात पकडलेल्या काही लोकांनी पोलिस चौकशीदरम्यान याबद्दलचे हे धक्कादायक खुलासे केल्याचं म्हटलं जातं.

(डिस्क्लेमर: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या मद्यपानाला समर्थनही देत नाही. मद्यपान करणे हे आरोग्यासाठी हानिकारकच आहे. )

 

 

 

 

 

 

 

 

 

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;