कमकुवत हाडांना जीवन देतील ‘या’ 5 बिया, आताच तुमच्या आहारात करा समाविष्ट

कमकुवत हाडांना जीवन देतील ‘या’ 5 बिया, आताच तुमच्या आहारात करा समाविष्ट

आजकाल प्रत्येकजणांच्या शरीरात पोषक तत्वांच्या कमतरतेमुळे हाडे कमकुवत होऊ लागलीत. बदलती जीवनशैली आणि खाण्याच्या चुकीच्या सवयी ही याची प्रमुख कारणे आहेत. शरीरात कॅल्शियमच्या कमतरतेमुळे हाडे कमकुवत होतात. पण ही समस्या तुम्हाला सतत सतावत राहिली तर शरीर इतर अनेक आरोग्य समस्यांना बळी पडण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत हाडांना मजबूती मिळवण्यासाठी आहारात बदल करणे गरजेचे आहे. हेल्थलाइनच्या मते, हाडांच्या चांगल्या आरोग्यासाठी शरीरात कॅल्शियमची योग्य पातळी असणे खूप महत्वाचे आहे. खरं तर, काही बिया अशा आहेत ज्या शरीराला ताकद देण्यास मदत करतात, तुम्ही या बियांचा तुमच्या आहारात समावेश केला पाहिजे.

बियांमध्ये कॅल्शियम आणि मॅग्नेशियमचे प्रमाण जास्त असते जे हाडे मजबूत करण्यास मदत करते. त्यांचे दररोज सेवन केल्याने कॅल्शियमची कमतरता दूर होते आणि हाडे मजबूत होण्यासही मदत होते. चला तर मग कोणत्या बिया आहेत त्याबद्दल जाणून घेऊयात…

चिया बियाणे

चिया बियांमध्ये भरपूर पोषक तत्वे असतात जी तुमच्या त्वचेसाठी तसेच आरोग्यासाठी फायदेशीर असतात. चिया बियांमध्ये कॅल्शियम, लोह, फायबर, ओमेगा-३ फॅटी ॲसिड असतात जे हाडे मजबूत करण्यास मदत करतात.

तीळ तुमची हाडे मजबूत करतील

तिळामध्ये मुबलक प्रमाणात कॅल्शियम असते जे शरीर निरोगी ठेवण्यास मदत करते. हाडे मजबूत करण्यासाठी देखील तीळ प्रभावी आहे. तुम्ही ते नियमितपणे सॅलडमध्ये टाकून किंवा तिळाचे लाडू बनवून खाऊ शकता.

अळशीच्या बिया देखील फायदेशीर

अळशीच्या बियांमध्ये कॅल्शियम आणि ओमेगा-3 फॅटी ॲसिड सारखे पोषक घटक भरपूर असतात जे हाडांची घनता मजबूत करण्यासाठी प्रभावी असतात. तुम्ही यांचे लाडू बनवून खाऊ शकता.

सूर्यफुलाच्या बिया देखील प्रभावी

हाडांच्या कमकुवतपणाच्या समस्येपासून मुक्त होण्यासाठी तुम्ही सूर्यफुलाच्या बिया खाऊ शकता. त्यात मॅंगनीज, कॅल्शियम, ओमेगा-3 फॅटी ॲसिडसारखे अनेक पोषक घटक असतात जे हाडे मजबूत करण्यास मदत करतात. तुम्ही ते तुमच्या आहारात मोड आलेल्या कडधान्याच्या सॅलडमध्ये मिक्स करून किंवा स्नॅक म्हणून समाविष्ट करू शकता.

खसखस कमकुवत हाडांना जीवदान देईल

खसखस ​​हाडे मजबूत करण्यास मदत करते. यामध्ये मॅंगनीज, लोह, कॅल्शियम, मॅग्नेशियम असे अनेक पोषक घटक असतात जे हाडांची कमकुवतपणा कमी करतात. तुम्ही उन्हाळ्यात खसखस सरबतात मिक्स करून पिऊ शकता.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Bangaldesh Election Update – बांगलादेशात निवडणूकांचे बिगुल वाजणार;  मोहम्मद युनूस यांनी तारीखच सांगितली Bangaldesh Election Update – बांगलादेशात निवडणूकांचे बिगुल वाजणार; मोहम्मद युनूस यांनी तारीखच सांगितली
बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे मुख्य सल्लागार मुहम्मद युनूस यांनी देशातील पुढील राष्ट्रीय निवडणुकीची घोषणा केली आहे. देशातील पुढील राष्ट्रीय निवडणूक 1...
वयाच्या 91 व्या वर्षी अभिनय क्षेत्रात पदार्पण करणार मिस्टर परफेक्शनिस्टची आई; आमिरने दिली माहिती
महाराष्ट्रातील जनतेच्या मनात आहे, तेच होईल, उद्धव ठाकरे यांच्या विधानाबाबत काहीच शंका नाही -संजय राऊत
महाराष्ट्रातील निवडणूक त्यांनी जिंकली नसून चोरली; संजय राऊत यांचा घणाघात
हिंदुस्थानची ‘कॉपी’ करायला गेले अन् तोंडावर आपटले, बिलावल भुट्टोंच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाला अमेरिकन खासदाराने फटकारले
‘स्टारलिंक’ची हिंदुस्थानात एंट्री
महाराष्ट्रात ‘निवडणूक चोरी’चा मामला; बोगस मतदान ते पुरावे लपवणे, राहुल गांधींनी 5 स्टेपमध्ये केलं षडयंत्र उघड