चेहऱ्यावर झटपट चमक आणण्यासाठी टोमॅटोचा असा करा समावेश, 10 दिवसांत दिसेल फरक

चेहऱ्यावर झटपट चमक आणण्यासाठी टोमॅटोचा असा करा समावेश, 10 दिवसांत दिसेल फरक

आपल्यापैकी प्रत्येकालाच आपली त्वचा निर्दोष आणि चमकदार हवी असते. यासाठी बाजारात उपलब्ध असलेल्या सर्वात महागड्या उत्पादनांचाही वापर केला जातो. पण त्यांच्या वापराने बऱ्याचदा चेहरा चमकत नाही. त्यामुळे अनेकांचा कल हा सध्या घरगुती उपायांकडे वळत आहे. अशातच त्वचा चमकदार करण्यासाठी घरगुती उपाय करून पाहणे सर्वात उत्तम आहे. कारण याने कोणतेच दुष्परिणाम त्वचेवर होत नाही. तर यासाठी तुम्ही तुमच्या स्वयंपाकघरातील भाज्यांची चव वाढवणारे टोमॅटोचा स्किन केअर रूटिंगमध्ये समावेश करू शकता. जे तुमच्या त्वचेच्या काळजीचा एक भाग आहे. हे केवळ तुमची त्वचा स्वच्छ करणार नाही तर मुरुम, काळे डाग यासारख्या समस्यांपासून आराम देण्यास देखील मदत करेल. तर या लेखात तुम्ही टोमॅटोला तुमच्या स्किन केअरचा भाग कसा बनवू शकता ते जाणून घेऊया.

खरं तर, टोमॅटोमध्ये भरपूर पोषक तत्वे असतात. त्यात व्हिटॅमिन ए, के, सी, लायकोपीन आणि अँटीऑक्सिडंट्स असतात जे त्वचेची नैसर्गिक चमक टिकवून ठेवण्यास मदत करतात. उन्हाळ्यात ते चेहऱ्यावर लावल्याने टॅनिंगची समस्याही कमी होते.

टोमॅटोने बनवा हे 5 फेस पॅक

टोमॅटो आणि मधाचा फेस पॅक

टोमॅटो आणि मधाचा फेस पॅक बनवण्यासाठी, एका भांड्यात टोमॅटोची प्यूरी घ्या. नंतर त्यात दही, बेसन टाका आणि फेस पॅक बनवा. आता तयार फेसपॅक 15-20 मिनिटे चेहऱ्यावर ठेवा आणि नंतर थंड पाण्याने चेहरा धुवा. यामुळे तुमची त्वचा मऊ होईल आणि तुम्हाला त्वरित चमक देखील मिळेल.

टोमॅटो आणि हळदीचा फेस पॅक

टोमॅटो आणि हळद दोन्ही त्वचा स्वच्छ करण्यास मदत करतात. एका भांड्यात टोमॅटोचा रस काढा आणि त्यात थोडी हळद आणि गुलाबपाणी टाका. नंतर हा फेस पॅक चेहऱ्यावर 10-15 मिनिटे लावा. यामुळे तुमची त्वचा नैसर्गिकरित्या चमकू लागते आणि हळदीमध्ये अँटीबॅक्टेरियल आणि अँटीसेप्टिक गुणधर्म असतात जे तुमच्या चेहऱ्यावरील मुरुमांची समस्या कमी करण्यास मदत करतात.

टोमॅटो आणि कॉफीचा फेस पॅक

टोमॅटो आणि कॉफीचा फेस पॅक बनवण्यासाठी, एका भांड्यात थोडे दही, टोमॅटोचा रस आणि कॉफी पावडर मिक्स करा, यानंतर ते चेहऱ्यावर 15 मिनिटे लावा आणि नंतर चेहरा धुवा. तेलकट त्वचा असलेल्यांसाठी हा फेस पॅक सर्वोत्तम आहे.

टोमॅटो आणि लिंबू त्वचेसाठी वरदान

टोमॅटो आणि लिंबू दोन्हीमध्ये व्हिटॅमिन सी जास्त प्रमाणात असते. त्यामुळे ते त्वचा स्वच्छ आणि नितळ होण्यास मदत होते. यासाठी एका भांड्यात टोमॅटोच्या रसात लिंबाचा रस मिक्स करा आणि तो चेहऱ्यावर 10-15 मिनिटे लावा आणि नंतर चेहरा धुवा. यामुळे तुमची त्वचा चमकदार होईल.

टोमॅटो आणि काकडीचा फेस पॅक

उन्हाळ्यात त्वचेला हायड्रेट ठेवण्यासाठी तुम्ही टोमॅटो आणि काकडीचा वापर करू शकता. यासाठी टोमॅटो आणि काकडीचा रस एकत्र करून चेहऱ्यावर लावा. यामुळे तुमच्या चेहऱ्यावरील टॅनिंग देखील कमी होते.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

मलायका अरोरा तिच्या दिवसाची सुरुवात एक चमचा ‘हा’ पदार्थ खाऊन करते; फिटनेसचं खरं सिक्रेट मलायका अरोरा तिच्या दिवसाची सुरुवात एक चमचा ‘हा’ पदार्थ खाऊन करते; फिटनेसचं खरं सिक्रेट
आजकाल लोक तंदुरुस्त राहण्यासाठी अनेक गोष्टी करून पाहतात. काही लोक व्यायाम करण्यासाठी जिममध्ये जातात, तर काही घरगुती उपाय करून पाहतात....
नाश्त्यात ‘हा’ पांढरा पदार्थ खाल्ल्याने लिव्हर खराब होऊ शकते, तुम्ही ते खाण्याची चूक करत आहात का?
Sindhudurg News – कणकवली रेल्वे स्थानकातील छताच्या सिलिंगचा काही भाग कोसळला; कमाचं स्ट्रक्चरल ऑडिट करा, शिवसेनेची मागणी
Megablock – रविवारी चाकरमान्यांचे ‘मेगा’ हाल! देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी तिन्ही मार्गावर ब्लॉक
ज्या भ्रष्टाचाराची माहिती मी पंतप्रधानांना दिली होती, त्याच भ्रष्टाचारात मला गोवलं – सत्यपाल मलिक
दहशतवादी मसूद अझहरच्या कुरापती, कश्मीरनंतर आता म्यानमारमध्ये उभारतोय जिहादी नेटवर्क
सोनिया गांधी यांची प्रकृती बिघडली, शिमलामधील आयजीएमसी रुग्णालयात दाखल