17,800 किलोमीटरचे अंतर 20 तासांत, सिडनी ते लंडन थेट विमान सेवा सुरू होणार

17,800 किलोमीटरचे अंतर 20 तासांत, सिडनी ते लंडन थेट विमान सेवा सुरू होणार

सिडनी ते लंडन या दोन शहरांतील थेट विमान सेवा 2027 पासून सुरू होणार आहे. क्वांटास एअरवेज कंपनी प्रोजेक्ट सनराईज या मोहिमेद्वारे ही विमान सेवा सुरू करणार आहे. जगातील सर्वात लांब असलेली नॉन स्टॉप विमान सेवा असून या दोन शहरांतील 17 हजार 800 किलोमीटरचे अंतर अवघ्या 20 तासांत पूर्ण केले जाणार आहे. हे विमान लांब उड्डाणांसाठी बनवण्यात आले आहे. प्रत्येक विमानातून 238 प्रवासी प्रवास करू शकतील. विमानात फर्स्ट, बिझनेस, प्रीमियम इकोनॉमी आणि इकोनॉमी क्लास असतील. यातील खास वैशिष्टय़े म्हणजे 40 टक्क्यांहून अधिक जागा या प्रीमियमसाठी राखीव ठेवल्या जातील. क्वांटास या मार्गावर दररोज विमान सेवा देण्यासाठी कमीत कमी तीन एअरबस ए350-1000 विमान तैनात करेल. विमानांची डिलिव्हरी 2026 च्या अखेरपर्यंत सुरू होण्याची शक्यता आहे. डिलिव्हरीत उशीर होण्याची शक्यता लक्षात घेऊन क्वांटासने 2027 पासून प्रोजेक्ट सनराईज लाँच करण्याचा निर्णय घेतला आहे. अल्ट्रा लाँग हॉल उड्डाणासाठी खूप खर्च येतो. नॉन स्टॉप उड्डाणासाठी जास्त इंधनाची गरज पडते. त्यामुळे कांटास जास्त इंधन बचत करणाऱया विमानांचा वापर करणार आहे.

कोणत्या सुविधा मिळणार

या विमानात फर्स्ट क्लास प्रवाशांना एक वेगळी केबिन मिळेल. यात 32 इंचाचा स्क्रीन, एक अलमारी, एक बेड आणि एक आरामदायक खुर्ची मिळेल. प्रीमियम इकोनॉमी आणि इकोनॉमी क्लासच्या प्रवाशांना लेगरूम आरामदायक सीट मिळतील. बिझनेस क्लासच्या प्रवाशांना आरामदायक खुर्ची मिळेल. लांब पल्ल्याच्या हवाई प्रवासासाठी एक खास वेलबीइंग झोन असेल. या ठिकाणी प्रवासी फिरू शकतील, स्ट्रेचिंग करू शकतील तसेच फ्रेश होऊ शकतील.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

डॉ. दीपक हरके यांचा रशियात होणार ‘ग्लोबल लीडर’ अवार्डने सन्मान डॉ. दीपक हरके यांचा रशियात होणार ‘ग्लोबल लीडर’ अवार्डने सन्मान
जगभरात 143 देशात 8500 हून अधिक सेवा केंद्राच्या माध्यमातून निःशुल्क ध्यानधारणा शिकवणाऱया प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाचे ध्यानधारणा प्रशिक्षक ब्रह्माकुमार डॉ....
गोव्यात होणार सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव, देश-विदेशांतून हिंदू उपस्थित राहणार
Operation Sindoor – मोदींनी घेतली राष्ट्रपतींची भेट
Mumbai Accident News – अपघातात तिघांचा मृत्यू
ज्येष्ठ अभिनेते माधव वझे यांचे निधन
Operation Sindoor – पाकिस्तानच्या गोळीबारात हरयाणाचा जवान शहीद
छत्तीसगड आणि तेलंगणाच्या सीमेवर पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये जोरदार चकमक; वीसहून अधिक नक्षलवाद्यांचा खात्मा