माऊंट अबूच्या नामांतराला विरोध
राजस्थान सरकारने माऊंट अबूचे नाव बदलण्याच्या आणि तिथे दारू आणि मांसाहारी पदार्थांवर बंदी घालण्याची योजना आखली आहे. या प्रस्तावाला स्थानिकांनी आणि अनेक संघटनांनी विरोध दर्शवला आहे. सोमवारी माऊंट अबूमधील 23 संघटनांनी निदर्शने केली. राजस्थानातील एकमेव हिल स्टेशन असलेल्या माऊंट अबूच्या नामांतरामुळे आणि दारू आणि मांसाहारी पदार्थांवरील बंदीमुळे अर्थव्यवस्थेवर परिणाम होईल, असा दावा आंदोलनकर्त्यांनी केला. माऊंट अबूचे नाव बदलून ‘अबू राज तीर्थ’ करण्याचा प्रस्ताव पहिल्यांदा ऑक्टोबर 2024 मध्ये नगरपालिका बैठकीत मांडण्यात आला होता.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List