रस्त्यावरून फरफटत नेत महिलेवर बलात्कार, चाकण एमआयडीसीतील घटना

रस्त्यावरून फरफटत नेत महिलेवर बलात्कार, चाकण एमआयडीसीतील घटना

कामावर निघालेल्या महिलेला अंधाराचा फायदा घेत रस्त्यावरून फरफटत निर्जनस्थळी नेत तिच्यावर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी रात्री चाकणजवळील मेदनकरवाडी येथे घडली. त्यामुळे एमआयडीसीमध्ये काम करणाऱया महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

पीडित महिला रात्रपाळीसाठी पंपनीत जात होती. यावेळी आरोपीने तिचा पाठलाग करत खंडोबा मंदिराजवळ तिचा रस्ता अडवला. त्यानंतर जबरदस्तीने तिला ओढत निर्जनस्थळी नेले. महिलेने आरडाओरडा करण्याचा प्रयत्नही केला. तिने आरोपीला चावाही घेतला. मात्र, तिच्यावर अत्याचार करून तो पसार झाला. त्यावेळी एक कामगार महिला आणि पुरुष तेथून जात होते. त्यांच्या मदतीने पोलीस नियंत्रण कक्षाला कॉल करून पीडित महिलेने पोलिसांना बोलावून घेतले. पोलीस उपायुक्त शिवाजी पवार, गुन्हे शाखेची पथके आणि स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले. श्वानपथक आणि फॉरेन्सिक पथकाची मदत घेण्यात आली आहे. पोलिसांकडून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत. आरोपीच्या शोधासाठी विशेष पथक तैनात करण्यात आले आहे. या घटनेमुळे औद्योगिक क्षेत्रात खळबळ उडाली असून, महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

‘चाकणच्या एका खासगी रुग्णालयात आणि त्यानंतर वायसीएम रुग्णालयात दाखल केले. आरोपीच्या शोधासाठी विशेष पथके तैनात करण्यात आली आहेत.’- प्रमोद वाघ, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, चाकण.

निर्मनुष्य परिसरामुळे महिलांची कुचंबना

घटना घडली तो परिसर अतिशय निर्मनुष्य आहे. या भागात मोठय़ा प्रमाणात वेश्याव्यवसाय करणाऱया तृतीयपंथीयांचाही वावर असतो. या तृतीयपंथीयांकडून रस्त्याने ये-जा करणाऱयांना अश्लील हावभाव करून इशारे केले जातात. त्यामुळे या रस्त्याने पंपनीत कामावर जाणाऱया महिलांची कुचंबना होते. या भागात महिलांची छेडछाड करण्याचे प्रकारही अनेकदा घडले आहेत. मात्र, पोलिसांकडे तक्रार करण्यास त्या धजावत नाहीत. कुटुंबीयांना सांगितल्यास नोकरी सोडून घरी बसण्याची वेळ येऊ शकते. त्यामुळे महिलांना हा त्रास सहन करावा लागतो.

आरडाओरडा व्यर्थ ठरला

पीडितेवर अत्याचार होत असताना तिच्यापासून काही अंतरावर एक व्यक्ती शतपावली करत होता. पीडितेने त्याला पाहिले आणि मोठय़ाने आरडाओरडा केला. मात्र, पीडितेचा आवाज त्याच्यापर्यंत पोहचला नाही. त्यामुळे पीडितेला कोणाची मदत मिळून शकली नाही.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Kokan News – प्लास्टिक कचरा गोळा करणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळणार बक्षीस; सृजन सायन्स सेंटरचा अभिनव उपक्रम Kokan News – प्लास्टिक कचरा गोळा करणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळणार बक्षीस; सृजन सायन्स सेंटरचा अभिनव उपक्रम
देवरुख शहरातील सृजन सायन्स अँड इनोव्हेशन ऍक्टिव्हिटी सेंटरतर्फे कचरा निर्मूलन मोहीम स्पर्धा विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आली आहे. यामध्ये विद्यार्थ्यांनी जास्तीत...
परतीच्या पावसाने कापलेली भात शेती पुन्हा रुजली, ऑक्टोबर महिना संपला तरीही पाऊस सुरूच
Kokan News – देवरुख येथील सृजन विज्ञान केंद्रात आली अवकाश शास्त्राची नवीन मॉडेल्स
किशोरवयीन मुलांना AI ची भुरळ, वैद्यकीय माहिती आणि रोमान्ससाठी AI चा अधिक वापर!
सरकारकडून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ, 5 रुपयांची दिली मदत; विजय वडेट्टीवार यांच्याकडून संताप व्यक्त
…असा असेल सत्याचा मोर्चा; सर्वपक्षीय बैठकीनंतर अनिल परब यांनी दिली माहिती
तुम्ही पण फ्रिजमध्ये ठेवलेला शिळा भात पुन्हा गरम करून खाता का? मग हे वाचाच; जाणून आश्चर्य वाटेल