Cyclone Shakti Alert: मान्सूनपूर्वी ‘शक्ती चक्रीवादळ’चा धोका, हवामान विभागाने जारी केला अलर्ट
मान्सूनच्या आगमनासोबतच देशात ‘शक्ती चक्रीवादळ’चा धोका निर्माण झाला आहे. या वादळामुळे ओडिशा, पश्चिम बंगाल आणि बांगलादेशच्या किनारी भागांवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. हिंदुस्थानी हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, मान्सूनने दक्षिण अंदमान समुद्र, निकोबार द्वीपसमूह, दक्षिण बंगालच्या खाडी आणि उत्तर अंदमान समुद्राच्या काही भागांमध्ये प्रवेश केला आहे.
हवामान तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, अंदमान समुद्रावर एक हवाई चक्रीवादळ तयार होत आहे. यामुळे 16 ते 22 मे दरम्यान कमी दाबाचे क्षेत्र तयार होऊ शकते. याच संदर्भात माहिती देताना बांगलादेशचे हवामानशास्त्रज्ञ मुस्तफा कमाल पलाश म्हणाले आहेत की, हे वादळ 22 ते 28 मे दरम्यान ‘शक्ती’ नावाच्या चक्रीवादळात बदलू शकते. जर त्याचे चक्रीवादळात रूपांतर झाले तर 24 ते 26 मे दरम्यान ते हिंदुस्थानच्या ओडिशा आणि पश्चिम बंगाल आणि बांगलादेशच्या खुलना आणि चितगाव किनारपट्टीच्या भागात धडकण्याची शक्यता आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List