अदानीने ओरबाडलेल्या जागेच्या स्वच्छतेसाठी मुंबईकरांना का पैसे भरायला लावताय? आदित्य ठाकरे यांचा सवाल

अदानीने ओरबाडलेल्या जागेच्या स्वच्छतेसाठी मुंबईकरांना का पैसे भरायला लावताय? आदित्य ठाकरे यांचा सवाल

अदानीच्या धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी देवनार डम्पिंग ग्राऊंडची जागा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. डम्पिंग ग्राऊंडची ही जागा स्वच्छ व राहण्याजोगी करण्यासाठी मुंबई महापालिकेने 2368 कोटी रुपयांचे टेंडर काढले आहे. त्यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, युवासेनाप्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांनी महापालिकेवर टीका करत ‘अदानीने ओरबाडलेल्या जागेच्या स्वच्छतेसाठी मुंबईकरांना का पैसे भरायला लावताय? असा सवाल केला आहे.

देवनारच्या जागेच्या स्वच्छतेचे टेंडर निघाल्याच्या बातमीवरून आदित्य ठाकरे यांनी ट्विट करत सरकारवर व महापालिकेवर टीका केली आहे. ”हेच कारण आहे ज्यासाठी महापालिका कचरा संकलन व वापरकर्ता शुल्काच्या रुपात मुंबईकरांकडून अदानी कर वसूल करत आहे. जमिन – अदानीने मुंबईकडून जबरदस्ती ओरबाडून घेतली. आता ती जमीन अदानी ग्रृपच्या मालकीची असून त्यावर धारावीतीली 50 हजार नागरिकांना घरं दिली जाणार आहेत. त्या जागेसाठी व अदानीसाठी मुंबईकरांच्या कराच्या माध्यमातून मिळत असलेला पैसा वापरला जात आहे. अदानीने ओरबाडलेल्या जागेच्या स्वच्छतेसाठी मुंबईकरांना का पैसे भरायला लावताय? असा सवाल आदित्य ठाकरे यांनी केला आहे.

मुंबईकरांवर कचरा संकलन व वापरकर्ता शुल्क लावण्याकरीता मुंबई महापालिकेने नवीन नियमावली तयारी केली आहे. मुंबईकरांकडून कचरा संकलन व वापरकर्ता शुल्क हे मालमत्ता कराचा भाग म्हणून वसूल केले जाणार आहे. अदानीला देण्यात येणाऱ्या देवनारची जागा स्वच्छ करून राहण्याजोगी करण्यासाठी मुंबईकरांकडून या कराच्या स्वरुपात पैसे घेतले जात आहेत, असा आरोप अनेकदा आदित्य ठाकरे यांनी केला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

शासनाचे संकेतस्थळ दोन दिवस बंद शासनाचे संकेतस्थळ दोन दिवस बंद
महाराष्ट्र राज्य शासनाचे अधिकृत संकेतस्थळ www.maharashtra.gov.in आणि शासन निर्णय संकेतस्थळ www.gr.maharashtra.gov.in हे पोर्टल नियमित देखभालीबरोबरच तांत्रिकदृष्ट्या अद्ययावत करण्यात येणार आहे,...
साई मंदिरातील ‘कुलूप संस्कृती’ला ग्रामस्थांचा विरोध
गोवंडीत घरात सुरू होता ड्रग्सचा धंदा, सहा कोटींचा ड्रग्ससाठा पोलिसांनी केला जप्त
Photo – बापरे! 40 कोटींचा ड्रेस, 1300 कोटींचे दागिने घालून कान्समध्ये पोहोचली उर्वशी
अदानीने ओरबाडलेल्या जागेच्या स्वच्छतेसाठी मुंबईकरांना का पैसे भरायला लावताय? आदित्य ठाकरे यांचा सवाल
अभिनेत्री छाया कदम पोहोचली कान्सला, या ‘मराठी’ चित्रपटाचे उद्या होणार स्क्रिनिंग
Balochistan : पाकिस्तानचा तुकडा पडला, बलुचिस्तान आता स्वतंत्र देश; बलुच नेत्याने केली मोठी घोषणा