लातूरच्या पर्यटकाचा आग्र्यात मृत्यू, ताजमहल पहायला गेला असता चक्कर येऊन कोसळला
ताजमहल पहायला गेलेल्या लातूरच्या पर्यटकाचा बुधवारी तेथेच मृत्यू झाला. ताजमहलच्या रॉयल गेटजवळ अचानक चक्कर येऊन जमिनीवर कोसळला. त्याला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. शिवलिंग बबय्या स्वामी असे मयत पर्यटकाचे नाव आहे.
शिवलिंग हे कुटुंबासोबत ताजमहल पहायला आग्रा येथे गेले होते. बुधवारी दुपारी 1.15 वाजण्याच्या सुमारास ताजमहलच्या रॉयल गेटजवळ त्यांना चक्कर आली आणि ते जमिनीवर कोसळले. सीआयएसएफच्या टीमने तात्काळ त्यांना रुग्णालयात नेले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. शिवलिंग यांच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप कळू शकले नाही. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे कारण कळू शकेल.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List