ट्रम्प यांनी शस्त्रसंधीची घोषणा आधीच कशी काय केली, पंतप्रधान मोदी गप्प का? काँग्रेसचा सवाल
हिंदुस्थान आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या शस्त्रसंधीची घोषणा अमरकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची आधीच काही काय केली? पंतप्रधान नरेंद्र मोदी यावर गप्पा का आहेत, असा सवाल काँग्रेसने उपस्थित केला आहे. आज ऑपरेशन सिंदूर आणि त्यानंतरच्या शस्त्रसंधीबाबत काँग्रेसची एक मोठी बैठक झाली.
या बैठकीनंतर यानंतर पत्रकार परिषदेत काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश म्हणाले की, “गेल्या 20 दिवसांत काँग्रेसची ही तिसरी मोठी बैठक आहे. यामध्ये सीडब्लूसी सदस्यांनीही सहभाग घेतला आहे. 22 एप्रिलपासून काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि राहुल गांधी वारंवार एकतेबद्दल बोलत आहेत. त्यांनी सरकारला पूर्ण पाठिंबा दिला आणि ऑपरेशन सिंदूरचे स्वागत केले. राहुल गांधी आणि पक्षाध्यक्ष म्हणाले की, आम्ही सरकार आणि सशस्त्र दलांच्या पाठीशी उभे आहोत. आम्ही दहशतवाद आणि पाकिस्तानविरुद्ध केल्या जाणाऱ्या कारवाईला पाठिंबा देत आहोत. दोन सर्वपक्षीय बैठका झाल्या. दोन्ही ठिकाणी पंतप्रधान मोदी उपस्थित नव्हते. ही सर्वपक्षीय बैठक औपचारिकतेसाठी आयोजित करण्यात आली होती. राहुल गांधी आणि खर्गे यांनी संसदेचे विशेष अधिवेशन बोलावण्यासाठी पंतप्रधानांना पत्र लिहिले आहे. ट्रम्प यांनी आधीच शस्त्रसंधीची घोषणा कशी काय केली? पंतप्रधान मोदी यावर काहीही बोलत नाहीत.”
जयराम रमेश म्हणाले की, ऑपरेशन सिंदूर ही कोणत्याही एका पक्षाची मक्तेदारी नाही. पण आता त्याचे राजकारण केले जात आहे. याचे श्रेय घेण्यासाठी राजकारण सुरू आहे. आम्ही देशातील महत्त्वाच्या शहरांमध्ये ‘जय हिंद’ सभा आयोजित करणार आहोत आणि जनतेच्या वतीने सरकारला प्रश्न विचारणार आहोत. राहुल गांधी शुक्रवारी दिल्लीत पत्रकार परिषद घेणार आहेत, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List