विजय शहा मुर्दाबाद…, कर्नल सोफिया कुरेशी यांच्यावर वादग्रस्त टिप्पणी करणाऱ्या भाजप मंत्र्यांच्या घरासमोर काँग्रेसची निदर्शनं
मध्य प्रदेशमधील भाजपचे कॅबिनेट मंत्री विजय शहा यांनी ऑपरेशन सिंदूरची माहिती देणाऱ्या कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबाबत आक्षेपार्ह टिप्पणी केली. त्यामुळे संपूर्ण देशभरातून संतापाची लाट उसळली आहे. त्यांना बडतर्फ करण्याची मागणी काँग्रेसकडून होत आहे. तसेच त्यांच्या विरोधात घोषणाबाजी केली जात आहे. काँग्रेसने त्यांच्या घराबाहेर निदर्शने करून त्यांच्या घराच्या नेमप्लेटवर काळे फासले आहे.
भाजपचे मंत्री विजय शहा यांनी एका कार्यक्रमात बोलत असताना कर्नल सोफिया यांच्याबाबत वादग्रस्त विधान केले होते. यामुळे संतप्त काँग्रेस नेते मनोज शुक्ला त्यांच्या अनेक समर्थकांसह विजय शहा यांच्या बंगल्यावर पोहोचले. आणि त्यांनी विजय शहा यांच्या नावाच्या पाटीवर काळी शाही फासली. त्यानंतर त्यांच्या बंगल्याच्या गेटवरही शाही फेकली. तसेच बंगल्याच्या बाहेर तिरंगाही फडकवण्यात आला. यावेळी त्यांनी त्यांच्या समर्थकांसह तेथे ‘विजय शहा मुर्दाबाद अशी घोषणाबाजीही केली. एवढेच नाही तर घोषणाबाजीदरम्यान काँग्रेस नेत्यांनी त्यांचा राजीनामाही मागितला.
BJP सरकार के मंत्री विजय शाह द्वारा “कर्नल सोफिया कुरैशी को आतंकवादियों की बहन” बताने के विवादित बयान को लेकर कांग्रेस नेता मनोज शुक्ला ने साथियों के साथ उनके बंगले पहुंचकर नेम प्लेट पर कालिख पोती!
• विजय शाह जैसे नेता सत्ता के नशे में इतना गिर चुके हैं कि अब वो देश की बहादुर… pic.twitter.com/c3aiOe1i8q
— MP Congress (@INCMP) May 13, 2025
कर्नल सोफिया कुरेशी यांच्यावरील आक्षेपार्ह टिप्पणीवर मध्य प्रदेश काँग्रेस अध्यक्ष जितू पटवारी यांनीही नाराजी व्यक्त केली. “हिंदुस्थानी सैन्याने अवघ्या 25 मिनिटांत पाकिस्तानमधील 9 दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. लष्कराच्या कारवाईत पाकिस्तानचे 40- 45 हून अधिक सैनिक मारले गेले. तसेच 100 हून अधिक दहशतवादी ठार झाले. परंतु आज मंत्री विजय शहा यांनी त्या मुलींविरुद्ध अपमानास्पद पद्धतीने भाषण केले. ज्यामुळे पाकिस्तानी सैन्य हादरले. आता मुख्यमंत्री मोहन यादव यांना स्पष्ट करावे लागेल की राज्य सरकार किंवा संपूर्ण मंत्रिमंडळ या विधानाशी सहमत आहे का? आणि जर तसे नसेल तर विजय शहा यांना आत्ताच बडतर्फ करावे”, असे त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
20 दिवसांनंतर पाकिस्तानच्या ताब्यातील बीएसएफ जवानाची झाली सुटका
दरम्यान, विजय शहा यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. यामुळे त्यांच्यावर टीका होऊ लागली. हे पाहून विजय शहा यांनी कर्नल सोफिया कुरेशी यांची माफी मागितली आहे. कर्नल सोफिया माझ्या स्वतःच्या बहिणीपेक्षा मला जास्त आदरणीय आहेत. जर माझ्या कोणत्याही टिप्पणीमुळे कोणाचे मन दुखावले असेल तर, मी 10 वेळा माफी मागण्यास तयार आहे, असे मंत्री विजय शहा म्हणाले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List