वयाच्या 58 व्या वर्षी या अभिनेत्रीचे बोल्ड अन् सेमीन्यूड फोटोशूट; सोशल मीडियावर जोरदार चर्चा
वय हा फक्त एक आकडा असतो असं आपण अनेकदा ऐकतो. आणि याची उदाहरणं बऱ्याचदा फिल्म इंडस्ट्रीमध्ये पाहायला मिळतात. जसं की अमिताभ बच्चन, त्यांचे वय पाहता त्यांच्या ऐनर्जीचे आणि आजही तेवढ्याच उत्साहात काम करण्याचं नेहमीच कौतुक होतं.आता अशाच एका अभिनेत्रीची सध्या चर्चा होताना दिसते. या अभिनेत्रीने चक्क 58 व्या वयात बोल्ड अन् सोमीन्यूड फोटोशूट केलं आहे. ते फोटो पाहून कोणालाही विश्वास बसणार नाही की ही अभिनेत्री चक्क 60 वयाच्या टप्प्यात आली आहे.
58 व्या वयात बोल्ड अन् सोमीन्यूड फोटोशूट
त्यामुळे खरोखरंच या अभिनेत्रीने हे पुन्हा एकदा सिद्ध केले आहे की वय हा फक्त एक आकडा आहे. ही अभिनेत्री आहे सलमा हायेक. हॉलिवूड अभिनेत्री सलमा हायेकने तिने केलेल्या बोल्ड फोटोशूटमुळे इंटरनेटवर खळबळ उडवून दिली आहे. सलमाने ‘स्पोर्ट्स इलस्ट्रेटेड’ या मासिकासाठी (मॅगझीन) कव्हर शूट केलं आहे. तिने तिच्या इंस्टाग्रामवर त्याचा बीटीएस व्हिडिओ देखील शेअर केला आहे.
बोल्ड मॅगझीन कव्हर शूट
58 वर्षीय सलमा हायेक यांचे हे फोटो पाहून सर्वांनाच धक्का बसला आहे. सोशल मीडियावर तिचे फोटो पाहून चाहत्यांनी तिच्या वायचं आणि फोटोशूटचे कौतुक करत जणू काही तिचे वय थांबले आहे का? अशा कमेंट्स करत आहेत.
शूटबाबत काय म्हणाली अभिनेत्री?
सलमाने एका मुलाखतीत शूटबद्दल तिचं मत व्यक्त केलं आहे. ती म्हणाली, ‘मी हे मासिक पाहायचे आणि जाणून घ्यायचे की यावेळी कोणत्या सुंदर मॉडेलला या मॅगझीनच्या मुखपृष्ठावर स्थान मिळाले आहे. पण मला हे कधीच वाटले नव्हते की माझे फोटो देखील एक दिवस या मॅगझीनच्या मुखपृष्ठावर येईल”. सलमा पुढे म्हणाली, ‘माझे शरीर मॉडेलसारखे नाही. मी 58 वर्षांची असताना मला ही संधी मिळेल असे मला कधीच वाटले नव्हते. हे माझ्यासाठीही धक्कादायक आहे.”
फोटोशुटचा आनंद घेतला
तसेच फोटोशूटबद्दल सलमा म्हणाली की, तिच्या पिढीतील मेक्सिकन महिलांना वाटते की त्या 35 वर्षांच्या होताच त्यांना नाकारलं जातं. वयाबद्दल शंका घेऊ लागतात. पण जेव्हा तिला हे फोटोशुट करण्या ची संधी मिळाली तेव्हा ती पूर्णपणे बिनधास्त होती आणि तिने शूटचा आनंद घेतला.
फोटोशुटवर चाहत्यांच्या भरभरून प्रतिक्रिया
दरम्यान फोटोशुटमध्ये सलमा स्विमिंग पूलमध्ये फोटोशूट करताना दिसत आहे. तिने अनेक आकर्षित अशा पोझ दिल्या आहेत. लोक सलमाच्या शूटचे खूप कौतुक करत आहेत. एका युजरने लिहिले आहे की, “58 वर्षांची सलमा आपल्या 20 ते 30 वर्षांच्या 90 टक्के लोकांपेक्षा चांगली दिसतेय.सलमाची त्वचा, केस पाहून ती 60 वर्षांची होणार आहे याची कल्पनाही करता येत नाही.” अशाच कमेंट्स बऱ्याच लोकांनी केल्या आहेत.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List