नीता अंबानी चा फिटनेस ट्रेनर विनोद चन्ना आहे गडगंज श्रीमंत; सोशल मीडियावर का केलं जातंय सर्च?
बॉलिवूड सेलिब्रिटींच्या लाईफस्टाईलबद्दल सर्वांनाच जाणून घ्यायला आवडंत. विशेषत: त्यांच्या फिटनेसबद्दल. जसं की ते काय खातात, कोणतं डाएट करतात. आणि मुख्य म्हणजे त्यांचे फिटनेस ट्रेनर कोण आहेत? याबद्दल जाणून घेण्याची प्रचंड उत्सुकता असते. त्याचपद्धतीने एका ट्रेनरची सध्या बरीच चर्चा होताना दिसत आहे. जे सेलिब्रिटींचे ट्रेनर तर आहेच पण सोबतच अंबानी कुटुंबातील सदस्यांचेही. सध्या नीता अंबानींचे ते फिटनेस ट्रेनर आहेत आणि त्यांचे नाव आहे विनोद चन्ना. विनोद हे भारतातील आघाडीच्या सेलिब्रिटी प्रशिक्षकांपैकी एक आहेत, ज्यांनी त्यांच्या कौशल्याने अनेक उच्च-प्रोफाइल क्लायंटच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवून आणले आहेत. विनोद चन्ना कोण आहेत आणि त्यांची फी किती आहे जाणून घेऊयात.
विनोद चन्ना हे 16 वर्षांहून अधिक अनुभव असलेले अनुभवी फिटनेस ट्रेनर
विनोद चन्ना हे 16 वर्षांहून अधिक अनुभव असलेले अनुभवी फिटनेस ट्रेनर आणि सल्लागार आहेत. ते मुंबईतील वांद्रे येथे असलेल्या व्हीसी फिटनेसचे संस्थापक आहेत.विनोद चन्ना यांनी नीता अंबानी, अनंत अंबानी, ईशा अंबानी, कुमार मंगलम बिर्ला, अनन्या बिर्ला, जॉन अब्राहम, शिल्पा शेट्टी कुंद्रा, अर्जुन रामपाल, विवेक ओबेरॉय, हर्षवर्धन राणे आणि इतर अनेक नामांकित व्यक्तींना प्रशिक्षण दिले आहे. त्याची प्रशिक्षण शैली वैयक्तिक गरजा, शरीरयष्टी आणि जीवनशैलीनुसार सानुकूलित केली आहे, ज्यामुळे कमी वेळेत उत्तम परिणाम मिळतात.
आता चन्ना नीता अंबानी यांचे फिटनेस ट्रेनर आहेत
अनंत अंबानीच्या वजन कमी करण्याच्या प्रवासात विनोद चन्ना यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. ज्यामध्ये अनंतने 18 महिन्यांत 108 किलो वजन कमी केले होते. ते आता नीता अंबानी यांनी फिटनेस ट्रेनिंग देत आहेत. नीता अंबानी वयाच्या 60 व्या वर्षीही फिटनेसकडे विशेष लक्ष देतात. नीता अंबानी त्यांच्या वर्कआउट रूटीनमध्ये योगा, स्ट्रेचिंग आणि वेट ट्रेनिंगचा समावेश करतात. विनोद चन्ना यांच्या मते, नीता अंबानी नियमितपणे व्यायाम करतात तसेच ते त्यांनी दिलेल्या नियमांनुसार वर्कआउटपासून ते डाएटपर्यंत सर्व काही पाळतात.
विनोद चन्ना यांची फि किती आहे?
विनोद चन्ना यांची फीची रक्कम ते कोणत्या प्रकारची ट्रेनिंग देतात आणि कस्टमायझेशनची पातळी यावर अवलंबून ठरवतात. जसं की वैयक्तिक प्रशिक्षण सेशनची फि 1.5 लाखांपर्यंत असते. हे शुल्क क्लायंटच्या वैयक्तिक गरजांनुसार तयार केलेल्या खास डिझाइन केलेल्या व्यायम आणि डाएटसाठी आहे.
घरी जाऊन वैयक्तिक प्रशिक्षण द्यायचं असल्यास किती फि घेतात?
सेलिब्रिटी फिटनेस ट्रेनर विनोद चन्ना यांच्या घरातील वैयक्तिक प्रशिक्षण शुल्क 3.5 लाख ते 5 लाखांपर्यंत आहे. ही सेवा अशा ग्राहकांसाठी आहे ज्यांना स्वतःच्या घरी प्रशिक्षण घ्यायचं आहे. तर चन्ना हे ऑनलाईनही फिटनेस ट्रेनिंग देतात. ऑनलाइन फिटनेस बिगिनर असतात त्यांच्यासाठी ते फक्त 500रुपयांपासून फि घेतात. ही फी अशा लोकांसाठी आहे ज्यांना फिटनेसची सुरूवात करायची आहे किंवा ज्यांचे काम हे बहुतेककरून ऑफिसमध्येच बसूनच करण्यासारखं आहे. ज्यामध्ये 1 आठवड्याचा 1.5 किलो चरबी कमी करण्याचं टार्गेट असतं. तर अशापद्धतीने ज्यांना कोणाला आपल्या फिटनेसची, वर्कआउटची सुरुवात करायची आहे ते देखील सुरुवात करूच शकतात.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List