महिला डॉक्टरचा विनयभंग प्रकरण- केईएमच्या वरिष्ठ डॉक्टरचा जामीन हायकोर्टाने फेटाळला, न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्देश

महिला डॉक्टरचा विनयभंग प्रकरण- केईएमच्या वरिष्ठ डॉक्टरचा जामीन हायकोर्टाने फेटाळला, न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्देश

महिला डॉक्टरचा विनयभंग केल्याप्रकरणी अटक टाळण्यासाठी हायकोर्टात धाव घेणाऱ्या केईएमच्या वरिष्ठ डॉक्टरला मुंबई उच्च न्यायालयाने दणका दिला आहे. या कृत्यामुळे पीडितेवर मानसिक व भावनिक आघात झाल्याचे स्पष्ट करत डॉक्टरचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायमूर्ती राजेश पाटील यांनी फेटाळून लावला आहे. रवींद्र देवकर असे त्या डॉक्टरचे नाव असून त्यांना निलंबित करण्यात आले आहे.

आपल्या पदाचा गैरफायदा घेत तसेच नको त्या ठिकाणी स्पर्श केल्याचा आरोप कनिष्ठ महिला डॉक्टरने केला होता.  सहा जणांनी डॉक्टरविरोधात अशा तक्रारी केल्या असून याप्रकरणी डॉ. देवकरविरोधात भोईवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी अटक टाळण्यासाठी देवकर याने सत्र न्यायालयात अर्ज केला, मात्र सत्र न्यायालयाने हा अर्ज फेटाळल्यानंतर त्याने हायकोर्टात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला. त्यावर न्यायमूर्ती राजेश पाटील यांच्यासमोर सुनावणी घेण्यात आली. न्यायालयाने डॉ. देवकरवर असलेल्या आरोपांची गंभीर दखल घेत अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला.

न्यायालयाचे निरीक्षण काय

याचिकाकर्त्याचा अटकपूर्व जामीन मंजूर केला तर ते सर्व तक्रारदार पीडितांवर सूड उगवण्याची शक्यता आहे. इतकेच नव्हे तर पुन्हा अशी कृत्ये याचिकाकर्ता करेल ही भीती नाकारता येणार नाही

देवकरविरोधात तक्रार करण्याची ही पहिलीच वेळ नाही. 2021 मध्येही महिला डॉक्टरने त्यांच्याविरोधात अशीच तक्रार केली होती.

अशा परिस्थितीत देवकरला जामीन दिल्यास ते उचित ठरणार नाही.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

IMD Weather Update : महाराष्ट्रावर पुन्हा मोठं संकट, उरले फक्त काही तास, आयएमडीचा पावसाबाबत मोठा इशारा IMD Weather Update : महाराष्ट्रावर पुन्हा मोठं संकट, उरले फक्त काही तास, आयएमडीचा पावसाबाबत मोठा इशारा
गेल्या काही दिवसांपासून राज्यात अनेक ठिकाणी अवकळी पाऊस पडत आहे, वादळी वाऱ्यासह झालेल्या या पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे....
नव्या सरन्यायाधीशांच्या आईलाही वाटतं निवडणुका बॅलेट पेपरवरच व्हाव्यात, काय म्हणाल्या कमलताई गवई?
इंटिमेट सीन शूट करताना या प्रसिद्ध अभिनेत्याने सुष्मिता सेनला केला चुकीचा स्पर्श; तिने रागात थेट…
शत्रुघ्न सिन्हांकडून फसवणूक केल्यानंतर, अभिनेत्रीने उकरलं पाकिस्तानी क्रिकेटरसोबत लग्न, आयुष्य झालं उद्ध्वस्त
या प्रसिद्ध बॉलिवूड सेलिब्रिटींनी पाकिस्तानी चित्रपटांमध्ये केलंय काम… चित्रपटही ठरलेत सुपरहीट
पाकिस्तानी अभिनेत्रीचे 2 भारतीय, तर 2 पाकिस्तानी नवरे, ‘ती’ गुपचूप उरकायची लग्न
‘या’ लोकांनी चुकूनही मखाणे खऊ नयेत अन्यथा आरोग्यावर होईल गंभीर परिणाम…