बीडच्या विद्यार्थ्याची पुण्यात आत्महत्या, अभ्यासाचा ताण,कुटुंबाच्या अपेक्षांचा भार

बीडच्या विद्यार्थ्याची पुण्यात आत्महत्या, अभ्यासाचा ताण,कुटुंबाच्या अपेक्षांचा भार

डॉक्टर होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या विद्यार्थ्याला अभ्यासाचा ताण आणि कुटुंबाच्या अपेक्षांचा भार सहन झाला नाही. ऑनलाइन सुरा मागवून या विद्यार्थ्याने गळा चिरून घेतला. उत्कर्ष महादेव शिंगणे (19) असे या विद्यार्थ्याचे नाव असून त्याने पुण्यात आत्महत्या केली. भोपाळमधील ‘एम्स’ वैद्यकीय महाविद्यालयात तो शिक्षण घेत होता.

मूळचा बीड येथील रहिवासी उत्कर्ष महादेव शिंगणे हा भोपाळमध्ये ‘एम्स’ वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेत असून पुण्यात लष्करी वैद्यकीय महाविद्यालयात एका कार्यक्रमासाठी आला होता. महाविद्यालयाच्या स्वच्छतागृहात त्याने स्वतःचा गळा चिरून घेतला. उत्कर्षच्या आत्महत्येची घटना उघडकीस येताच एकच खळबळ उडाली. पोलिसांनी केलेल्या प्राथमिक चौकशी उत्कर्ष हा अभ्यासामुळे तणावात होता. त्यातच कुटुंबाच्या अपेक्षांचे ओझेही त्याच्यावर होते.

व्हॉट्सअ‍ॅपवरून पालकांना पाठवली सुसाईड नोट

उत्कर्षने आत्महत्या करण्यापूर्वी पालकांना व्हॉट्सअ‍ॅपवर एक सुसाईड नोट पाठवल्याचे पोलिसांनी सांगितले. कुटुंबातील सदस्यांनी सकाळी मेसेज पाहिल्यानंतर ही घटना उघडकीस आली. त्यानंतर पुणे पोलीस नियंत्रण कक्षाला कळवण्यात आले. उत्कर्षचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवण्यात आला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;