धोका अजून टळलेला नाही, काहीही होऊ शकते; जगभरातील मीडियाने हिंदुस्थान- पाकिस्तान युद्धावर व्यक्त केली भीती
हिंदुस्थान आणि पाकिस्तानमध्ये अखेर शस्त्रसंधी झाली, परंतु धोका अजून टळलेला नाही, अजूनही काहीही होऊ शकते, अशी भीती जगभरातील मीडियाने व्यक्त केली आहे. येणाऱया काळात संघर्ष आणखी चिघळू शकतो, असे ‘न्यूयॉर्क टाइम्स’ने म्हटले आहे.
दोन्ही देश युद्धाच्या उंबरठ्यावरून मागे हटले असले तरी या संघर्षात अनेक नव्या गोष्टी होत्या. नव्या मिलिटरी तंत्रज्ञानाच्या माध्यमातून हवाई हल्ले करण्याता आले. पहिल्यांदा दोन्ही देशांनी हजारो सशस्त्र ड्रोन्सचा वापर केला, ही बाब ‘न्यूयॉर्क टाइम्स’ने अधोरेखित केली आहे. तर अमेरिकेतील वर्तमानपत्र ‘वॉशिंग्टन पोस्ट’ने हिंदुस्थान आणि पाकिस्तानात शस्त्रसंधी करार होण्यासाठी अमेरिकेने मदत केल्याचे म्हटले आहे, परंतु हा शस्त्रसंधी करार टिकेल का? असा सवालही केला आहे. ‘सीएनएन’ने सर्वात भीषण युद्ध संपण्याची आशा जिवंत झाल्याचे म्हटले आहे.
फ्रान्समधील प्रसारमाध्यमे काय म्हणाली…
फ्रान्समधील वृत्तपत्र ‘फ्रान्स 24’ ने 10 मेच्या सायंकाळी शस्त्रसंधी झाल्याचे वृत्त दिले तसेच त्याच रात्री शस्त्रसंधीचे उल्लंघन झाल्याबद्दल प्रतिक्रियाही दिली. रात्रभर चाललेल्या संघर्षानंतरही हिंदुस्थान आणि पाकिस्तानदरम्यान शस्त्रसंधी करार जारी आहे. ‘द गार्डियन’ने दोन्ही देशांमध्ये शस्त्रसंधी झालेली असली तरी दशकांपासून सुरू असलेला विवाद आणि शत्रुत्व अद्याप कायम आहे, असे म्हटले आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List