दुबईतील परिवाराची अनोखी भक्ती, साईंना 24 लाखांची सोन्याची अक्षरं दान

दुबईतील परिवाराची अनोखी भक्ती, साईंना 24 लाखांची सोन्याची अक्षरं दान

शिर्डीच्या साईबाबांना दुबई येथील एका साईभक्त परिवाराने तब्बल 270 ग्रॅम वजनाची सोन्याची ॐ साई अक्षरं दान स्वरूपात दिली आहेत. या अक्षराची ंिकमत सुमारे 24 लाख रुपये असल्याची माहिती साईबाबा संस्थानच्यावतीने देण्यात आली. साईबाबांचे भक्त जगाच्या कानाकोपऱयात आहेत. शिर्डीच्या साईबाबांनी ‘सबका मालिक एक’ चा महामंत्र द्वारकामाईतून जगाला दिला. आपलं संपूर्ण जीवन साईबाबांनी द्वारकामाईत घालवलं. साईबाबा ज्या भिंतीला खेटून उभे राहत असत तिथे आज सर्वधर्मीय भक्त येऊन दर्शन घेतात. याच भिंतीवर लावण्यासाठी दुबई येथील एका साई भक्ताने ‘ॐ साई’ ही सोन्याची अक्षरे साई संस्थानला दान स्वरूपात दिली आहेत. भाविकाने हे दान गुप्त स्वरूपात दिले असून ही अक्षरे द्वारकामाईत मंदिरात लावण्यात आली आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

लढाऊ विमानांच्या घेऱयात ट्रम्प सौदीत; 12.1 लाख कोटींचा संरक्षण करार लढाऊ विमानांच्या घेऱयात ट्रम्प सौदीत; 12.1 लाख कोटींचा संरक्षण करार
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आजपासून सौदी अरेबियाच्या दौऱयावर असून ते आज सौदीच्या एफ 15 या लढाऊ विमानांच्या घेऱ्यात देशात दाखल...
मंत्रालयाच्या नियंत्रण कक्षात धमकीचा ई-मेल; दोन दिवसांत बॉम्बस्फोट होणार
जोगेश्वरीच्या रायगड मिलिटरी स्कूलचा निकाल 100 टक्के!
कुख्यात गजा मारणेला दिली बिर्याणी; पाच पोलीस निलंबित
तुरुंगातील कैद्यांची उत्पादने कैद्यांसाठीच वापरणार
धर्मवीर संभाजी महाराज जन्मोत्सव सोहळा
‘कामत गोविंदा’चे श्रीकांत कामत यांचे निधन