शत्रुघ्न सिन्हांकडून फसवणूक केल्यानंतर, अभिनेत्रीने उकरलं पाकिस्तानी क्रिकेटरसोबत लग्न, आयुष्य झालं उद्ध्वस्त
Love Life: झगमगत्या विश्वात असे अनेक सेलिब्रिटी आहेत, ज्यांनी अभिनेत्रींची फसवणूक केली आणि त्यांना कठीण काळात सोडून दुसऱ्या महिलेसोबत संसार थाटला. अशात अभिनेत्यां पैकी एक म्हणजे अभिनेते शत्रुघ्न सिन्हा. शत्रुघ्न सिन्हा यांचं लग्न पूनम सिन्हा यांच्यासोबत झालं होतं. पण असं असताना देखील शत्रुघ्न सिन्हा अभिनेत्री रीना रॉय हिच्यासोबत रिलेशनशिपमध्ये होते. लग्नानंतर देखील विवाबबाह्य संबंध ठेवल्यामुळे शत्रुघ्न सिन्हा यांना पश्चाताप होतो. याची खंत देखील त्यांनी एका मुलाखतीत बोलून दाखवली.
रीना रॉय यांच्याबद्दल सांगायचं झालं तर, त्यांच्या खासगी आयुष्यात प्रेमाची एन्ट्री तर झाली, मात्र त्यांना अनेक चढ-उतारांचा सामना करावा लागला. बॉयफ्रेंडनंतर त्यांच्या पतीने देखील अभिनेत्रीची फसवणूक केली. इंडस्ट्रीमध्ये काम करत असताना रीना यांची ओळख स्वतःपेक्षा ११ वर्ष मोठे अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांच्यासोबत झाली.
रिपोर्टनुसार, शत्रुघ्न सिन्हा आणि रीना रॉय यांनी एकमेकांना जवळपास 7 वर्ष डेट केलं. पण त्यांचं नातं लग्नापर्यंत पोहचू शकलं नाही. अखेर शत्रुघ्न सिन्हा यांनी रीना यांच्यासोबत असलेलं नातं संपवलं आणि पूनम सिन्हा यांच्यासोबत लग्न केलं. लग्नानंतर देखील रीना रॉय आणि शत्रुघ्न सिन्हा यांचं प्रेमसंबंध सुरु होते.
पण दोघांचं नातं फार काळ टिकलं नाही. या धक्क्यातून सावरायला रीना रॉय यांना बराच काळ लागला. याच दरम्यान अभिनेत्रीची ओळख पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटू मोहसिन खान यांच्यासोबत झाली आणि दोघांनी लग्न केलं. पण पाकिस्तानी क्रिकेटसोबत लग्न करणं अभिनेत्रीला महागात पडलं.
अभिनेत्रीच्या आयुष्यात अनेकदा प्रेमाची एन्ट्री झाली, पण खरं प्रेम तिला कधी मिळालं नाही. लग्नानंतर रीना यांनी एका मुलीला जन्म दिला. पण मुलीच्या जन्मानंतर दोघांमध्ये वाद होवू लागले. अखेर रीना आणि मोहसिन खान यांचा घटस्फोट झाला. घटस्फोट झाल्यानंतर रीना मुलीला घेवून पुन्हा मुंबईमध्ये आल्या.
आता रीना रॉय यांची एक्टिंग अकॅडमी आहे, हे फार कमी लोकांना माहिती आहे. घटस्फोटानंतर रीना रॉय यांनी मुलीचं नाव देखील बदललं आहे. रीना यांच्या मुलीचं नाव जन्नत असं होतं. पण घटस्फोटानंतर मुलीचं नाव बदलून त्यांनी सनम रॉय असं ठेवलं.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List