भिवंडीत बफर झोनमध्ये कांदळवनाची कत्तल, 22 जणांवर गुन्हा दाखल
भिवंडी तालुक्यात खाडीलगत बफर झोनमध्ये असलेल्या कांदळवनाची कत्तल करणाऱ्या विकासकांसह 22 शेतकऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विकास आणि शेतकऱ्यांनी बफर झोनमध्ये तिवरांची झाडे हटवून मातीचा भराव केला आहे. काही ठिकाणी बफर झोनमध्ये अनधिकृत इमारतीही बांधण्यात आल्या आहेत.
दिवे अंजुर या गावच्या हद्दीत इंडियन कॉर्पोरेशनचे मालक गोदाम विकासक रुद्रप्रताप त्रिपाठी यांनी शेतकरी द्रौपदी म्हात्रे व इतर २१ जणांच्या संगनमताने कांदळवनाची कत्तल करून पर्यावरणाचा ऱ्हास केला आहे. तसेच वनविभागाकडील वनपाल खारबाव, वनरक्षक कशेळी व वनरक्षक आलिमघर यांनी एम.आर.एस.ए.सी.मधील 2005 नकाशानुसार प्रत्यक्ष पडताळणी केली असता सर्व्हे नंबर 27, 31 व 32 यामध्ये पूर्वी सदर ठिकाणी कांदळवनाची कत्तल केल्याने या जागेवरील कांदळवन नष्ट झाले आहे. याप्रकरणी भिवंडी मंडळ अधिकारी राजेंद्र वंजारी यांनी दिलेल्या तक्रारीवरून विकासक रुद्रप्रताप त्रिपाठी, शेतकरी द्रौपदी म्हात्रे व इतर 21 जणांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक होळकर हे करीत आहेत.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List