Amritsar News- विषारी दारूने केला घात; 15 जणांचा मृत्यू, तर 6 जणांची प्रकृती गंभीर
पंजाबच्या अमृतसरमध्ये विषारी दारू पिणे लोकांच्या जीवावर बेतले आहे. यामुळे एकूण 15 जणांचा मृत्यू झाला असून 6 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. या 6 जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, विषारी दारूमुळे जीव गमावणारी लोकं ही अमृतसरच्या मजीठा भागातील गावांमधील रहिवाशी आहेत. विषारी दारू प्यायल्यामुळे 15 लोकांचा मृत्यू झाल्याचे अमृतसरचे वरिष्ठ पोलीस अधिकारी मनिंदर सिंह यांनी सांगितले. यासंदर्भात आता पोलीस अधिक तपास करत आहे. चौकशीदरम्यान या विषारी दारूचा पुरवठादार साहब सिंगचे नाव समोर आले आहे. त्यामुळे आम्ही त्यालाही पकडले आहे. तसेच लोकांनी ही दारू कोणत्या कंपन्यांकडून खरेदी केली याचाही आम्ही तपास करत आहोत.” असे पोलीस अधिकारी म्हणाले.
“आम्हाला पंजाब सरकारकडून बनावट दारू पुरवठा करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश मिळाले आहेत. त्यामुळे दारूच्या अड्ड्यांवर छापे टाकले जात आहेत आणि लवकरच दारू बनवणाऱ्यांनाही पकडले जाईल. आत्तापर्यंत या प्रकरणी दोन एफआयआर दाखल करण्यात आले आहेत., अशी माहिती पोलिसांनी दिली.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List