SSC Result 2025 – दहावीचा निकाल जाहीर, राज्याचा निकाल 94.10 टक्के; कोकण विभाग अव्वल! पुन्हा मुलींनी मारली बाजी

SSC Result 2025 – दहावीचा निकाल जाहीर, राज्याचा निकाल 94.10 टक्के; कोकण विभाग अव्वल! पुन्हा मुलींनी मारली बाजी

दरवर्षीप्रमाणे यंदाही महाराष्ट्र बोर्डाच्या दहावीच्या निकालाची उत्सुकता ताणली होती. राज्याचा एकूण निकाल हा 94.10 टक्के इतका लागला असून, पुन्हा एकदा मुलींनी बाजी मारली आहे. सर्व विभागीय मंडळातून कोकण विभागाचा निकाल हा 98.82 टक्के इतका लागला आहे. तर सर्वाधिक कमी निकाल हा नागपूरचा 90.78 टक्के लागला आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या 9 विभागातील मंडळांमार्फत परीक्षा घेण्यात आल्या होत्या. यातून 15,58,020 नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यापैकी 14,55,433 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

यंदाच्या निकालात पुन्हा एकदा मुलींनी बाजी मारलेली असून, विद्यार्थ्यांचे सरासरी यश दरवर्षी सुधारत चालल्याचे शिक्षण मंडळाने जाहीर केलेल्या आकडेवारींमधून दिसून येत आहे.

हा रिझल्ट जाहीर झाल्यानंतर 10 वीची परीक्षा दिलेले सर्व विद्यार्थी महाराष्ट्र बोर्डाचा निकाल जाहीर झाल्यानंतर mahresult.nic.in, sscresult.mkcl.org आणि sscresult.mahahsscboard.in या लिंकवर तपासू शकता. https://mahahsscboard.in या अधिकृत वेबसाईट्सवर शाळांना एकत्रितपणे निकाल पाहता येणार आहे.

यंदा सुमारे 16 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली आहे. उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची टक्केवारी, विद्यार्थ्यांची संख्या, विभागवार निकाल इत्यादींचा समावेश त्यामध्ये असेल. यावर्षी दहावीची परीक्षा 21 फेब्रुवारी रोजी सुरू झाली आणि 17 मार्च रोजी संपली होती.

दहावीचा निकाल तपासण्यासाठी काय कराल?

महाराष्ट्र बोर्डाची अधिकृत वेबसाइट mahahsscboard.in ला भेट द्या.

होम पेजवर उपलब्ध असलेल्या महाराष्ट्र एसएससी निकाल 2025 लिंकवर क्लिक करा.

एक नवीन पेज उघडेल, त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना त्यांचे डिटेल्स द्यावे लागतील.

सबमिट वर क्लिक करा आणि निकाल पहा.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;