बॉयलर नेणाऱ्या आयशरला ट्रकची धडक, वेरूळ घाटातील अपघातात सासू-जावयाचा जागीच मृत्यू

बॉयलर नेणाऱ्या आयशरला ट्रकची धडक, वेरूळ घाटातील अपघातात सासू-जावयाचा जागीच मृत्यू

गुरुवारी दुपारी चार वाजता वेरूळ घाटामधून मोठ्या आकाराचे बॉयलर घेऊन जाणाऱ्या आयशर ट्रकला दुसऱ्या ट्रकने धडक दिल्याने आयशरवरील बॉयलर खाली कोसळले. बाजूने जाणारे मोटारसायकलवरील सासू – जावई या बॉयलरखाली दबल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. आयशरमधून घाटात पडलेल्या बॉयलर मार्गावरून जाणाऱ्या कारला अडकल्याने मोठी जीवित हानी टळली. या अपघातात दोन ट्रक, कार व मोटारसायकल हे एकमेकांना धडकले.

आज दुपारी चार वाजता औद्योगिक वापराकरिता असलेला ४० फूट रुंद व ६० फूट उंच असा भव्य बॉयलर घेऊन आयशर (एम एच ४२ एजी ९६४६) वेरूळ येथून रत्नपूरकडे येत होता. रस्ता दाखवण्यासाठी व अडथळे दूर करण्यासाठी सोबत काही मजूर पुढे चालत होते. याच वेळी रत्नपूरकडून ट्रक (एम एच २० जीपी १४०४) वेरूळकडे जात होता. या ट्रकला वेग कमी करण्याची सूचना या मार्गावर चालणाऱ्या मजुरांनी दिली. मात्र, ट्रकचा वेग जास्त असल्याने चालकाला कंट्रोल करता आला नाही. ट्रक बॉयलर घेऊन जाणाऱ्या आयशरला धडकला. या धडकेमुळे आयशर ट्रकवर ठेवलेले बॉयलरचे पट्टे तुटले व बॉयलर घाटामध्ये रस्त्यावर आडवे पडले. त्याचवेळी कचरू सांडू त्रिभुवन व त्यांच्या सासू चंद्रभागाबाई आसाराम भालेराव हे मोटारसायकलने (एम एच २० जीपी १४०४) वेरूळहून रत्नपूरकडे येत असताना दोघे बॉयलरखाली दबल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. बॉयलर घाटातून जात असताना वेरुळ कडून रत्नपूरकडे कारने (एमएच २८ व्ही ०३३०) कुटुंबीयांसह जाणारे संदीप घुगे (रा. मेहगाव, तालुका कन्नड) यांच्या ही बाब लक्षात आली. त्यांनी प्रसंगावधान राखत कार बाजूला घेतली. बॉयलर कारला अडकले व थांबले. त्यामुळे मोठी जीवित हानी टळली.

वेरूळ घाटातील रस्त्यावर बॉयलर आडवे झाल्याने वाहने जाणे शक्य नसल्याने या मार्गावरील दोन्ही बाजूकडील सर्व वाहतूक पोलिसांनी तातडीने थांबविली. बॉयलर बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलीस निरीक्षक धनंजय फराटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी व नागरिकांनी शर्तीचे प्रयत्न केले. सायंकाळी सात वाजता त्यांच्या प्रयत्नांना यश येऊन वाहतूक सुरळीत करण्यात आली. या अपघातामध्ये ठार झालेले कचरू सांडू त्रिभुवन हे वेरूळ येथील गुरुकुल विद्यालयाच्या पाठीमागे राहत होते. ते वेल्डिंगचे काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवत होते. घरातील एकमेव कमावती व्यक्ती असल्याने त्यांच्यावरच संपूर्ण कुटुंब अवलंबून होते. त्यांच्या अपघाती निधनामुळे पत्नी, मुलगा व दोन मुलींवर मोठे संकट कोसळले. त्यांच्या सासू चंद्रभागाबाई आसाराम भालेराव या रत्नपूर येथील राजीव गांधीनगरमध्ये राहत होत्या. त्यांच्या पश्चात मुलगा व दोन मुली असा परिवार आहे.

जड वाहनांसाठी घाट बंद

वेरूळ घाटामध्ये जड वाहतूक कायमस्वरूपी बंद करण्यात आलेली आहे. ही वाहतूक सोलापूर हायवेमार्गे वळवण्यात आलेली आहे. रत्नपूर येथील उर्स सुरू असल्याने या मार्गावरील छोटी वाहने वगळता सर्व वाहतूक पोलिसांनी वळवली आहे. मात्र, इतका मोठा बॉयलर कोणतीही सुरक्षिततेची उपाययोजना न करता बंदी असतानाही घाटातून कसा आला, महामार्ग पोलिसांनी मोठा कंटेनर येण्यासाठी परवानगी कशी दिली, असे प्रश्न उपस्थित होत आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

रत्नागिरीत तिळाच्या शेतीचे क्षेत्र घट, स्थानिक पातळीवर संवर्धनाची नितांत गरज रत्नागिरीत तिळाच्या शेतीचे क्षेत्र घट, स्थानिक पातळीवर संवर्धनाची नितांत गरज
रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यात पूर्वी भरभराटीत असलेली तिळाची शेती आता दुर्मिळ होत चालली आहे. औषधी गुणधर्म असलेल्या आणि अन्नतेल म्हणून...
पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेत सापडले हजारो अपात्र लाभार्थी, सरकारला 100 कोटींहून अधिक नुकसान
आज खरी भाजप सत्तेत नाहिये, भारत – पाकिस्तान सामन्यावरून आदित्य ठाकरे यांचा टोला
संपूर्ण महाराष्ट्र ठाकरेंच्याच मागे जाणार! नाशिकमधील विराट मोर्चातून संजय राऊत यांची गर्जना
किचनमधील या ५ गोष्टी कधीही चेहऱ्यावर लावू नका, त्वचेचे होईल नुकसान
60 कोटींच्या फसवणुकीच्या आरोपावर शिल्पा शेट्टीच्या पतीने सोडले मौन
कसा विश्वास ठेवायचा यांच्या बोलण्यावर? मोदी-फडणवीस यांचे व्हिडीओ शेअर करत अंजली दमानिया यांचा घणाघात