विराट-अनुष्काला कॅफेतून बाहेर काढलं; महिला क्रिकेटपटूंसमोर घडला धक्कादायक प्रकार, न्यूझीलंडमध्ये नेमकं काय झालेलं?
टीम इंडियाचा रनमशीन विराट कोहली सध्या क्रिकेटपासून दूर आहे. विराटने टी-20 आणि कसोटी क्रिकेटला रामराम ठोकला असून फक्त वन डे क्रिकेटवर लक्ष केंद्रीत केले आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या वन डे मालिकेत तो खेळण्याची शक्यता आहे. तत्पूर्वी तो अनुष्का शर्मासोबत लंडनमध्ये खास वेळ घालवत असून अधूनमधून त्यांचे फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. मात्र आता तो एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. हिंदुस्थानच्या महिला संघाची स्टार खेळाडू जेमिमा रॉड्रिग्ज हिने विराट-अनुष्कासोबत न्यूझीलंडमध्ये घडलेला एक धक्कादायक प्रसंग सांगितला आहे.
विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांना न्यूझीलंडमधून एका कॅफेतून अक्षरश: हाकलून लावले होते. जास्त वेळ थांबल्यामुळे दोघांना कॅफेतून बाहेर काढण्यात आले होते. हा प्रकार घडला तेव्हा टीम इंडियाच्या काही महिला खेळाडूही तिथे उपस्थित होत्या. जेमिमा रॉड्रिग्ज हिने ‘मॅशेबल इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये याबाबत खुलासा केला आहे.
जेमिमा रॉड्रिग्ज आणि स्मृती मंधाना न्यूझीलंडमध्ये विराट-अनुष्कासोबत एका कॅफेमध्ये गेले होते. स्मृतीला विराटची भेट घ्यायची होती आणि त्याच्याकडून फलंदाजीबाबत काही टिप्सही घ्यायच्या होत्या, असे जेमिमाने सांगितले. आमची चर्चा सुरू होती तेव्हा तिथे अनुष्का शर्माही उपस्थित होती.
सुरुवातीला अर्धा तास फक्त क्रिकेट तास चर्चा झाली. विराटने स्मृती आणि मला तुमच्याकडे महिला क्रिकेटचे रुप बदलण्याची ताकद असून मला तसे घडताना दिसत असल्याचे म्हटले. त्यानंतर आम्ही आयुष्य आणि इतर विषयांवरही चर्चा केली. आमच्या गप्पा जवळपास 4 तास रंगल्या होत्या. जणू काही हरवलेले जुने मित्र पुन्हा भेटले आणि हितगुज करत बसलेत अशीच ती भावना होती. पण शेवटी आम्हाला थांबावे लागले. कारण कॅफेच्या कर्मचाऱ्यांना आम्हाला बाहेरचा रस्ता दाखवला, असेही जेमिमाने मजेशीर अंदाजात सांगितले.
दरम्यान, विराट कोहली आता फक्त वन डे क्रिकेट खेळणार असून क्रिकेटनंतर तो लंडनला स्थायिक होणार आहे. अनुष्का आणि दोन अपत्यांसह विराट लंडनला राहणार आहे. अर्थात त्यामुळे त्याच्यावर टीकाही होत राहते. पण मुलांच्या भविष्यासाठी आणि त्यांना खासगी आयुष्य चांगल्या पद्धतीने जगता यावे यासाठी दोघांनी हा निर्णय घेतला आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List