Hair Care- केसांच्या घनदाट वाढीसाठी हे स्प्रे ठरतील सर्वात बेस्ट.. तुमचेही केस गुडघ्यापर्यंत वाढतील

Hair Care- केसांच्या घनदाट वाढीसाठी हे स्प्रे ठरतील सर्वात बेस्ट.. तुमचेही केस गुडघ्यापर्यंत वाढतील

केस हे प्रत्येक मुलीचा आवडता विषय. म्हणूनच केसगळती झाल्यावर मुलींची आणि महिलांची झोपच उडते. सध्याच्या घडीला केसगळती ही खूप काॅमन समस्या निर्माण झालेली आहे. आपल्याला प्रत्येकीला लांब केस आवडतात. परंतु धूळ आणि प्रदुषणामुळे सध्या केसांची वाढ खुंटू लागली आहे. केसवाढीसाठी अनेक उत्पादने बाजारात उपलब्ध आहेत. परंतु रासायनिक उत्पादनांमुळे केसांवरही विपरीत परीणाम होऊ लागतो. अशावेळी पूर्वापार चालत आलेले अनेक उपाय कामी येतात. काळा चहा हा त्यातलाच एक महत्त्वाचा उपाय. चहामध्ये असलेले अँटीबॅक्टेरियल गुणधर्म केस निरोगी ठेवण्यास मदत करतात. तसेच चहा आपल्या डोक्यावरील त्वचेवर लावल्याने केसांमध्ये कोंडा आणि खाज येण्याची समस्या उद्भवत नाही. केसांची वाढ उत्तम करायची असेल तर, बाजारातील उत्पादनांपेक्षा काळा चहा हा एक उत्तम पर्याय आहे.

काळ्या चहाचा स्प्रे 

तुम्हाला कमी वेळात केसांची वाढ हवी असल्यास, या चहाचा स्प्रे देखील वापरू शकता. यासाठी तुम्हाला चहा उकळून घ्यावा लागेल. त्यानंतर तो थंड झाल्यावर बाटलीत भरावा. केसावर हे पाणी स्प्रे करुन, नंतर 30 मिनिटे तसेच राहू द्यावे.
यानंतर, केस शॅम्पूने स्वच्छ करा. हा स्प्रे लावल्याने तुमच्या केसांची वाढ सुधारेल.

 

 

 

काळा चहा कसा बनवाल?

यासाठी तुम्हाला 3 ते 4 काळ्या चहाच्या बॅग्ज घ्याव्या लागतील. या टी बॅग्ज पाण्यात उकळवा. मग हे पाणी थंड होऊ द्यावे लागेल. हे पाणी तुमच्या केसांना लावा आणि हलक्या हाताने मसाज करा. यानंतर, केस शॅम्पूने स्वच्छ करा. हा चहा केसांना लावल्याने तुमचे केस ओलावा टिकून राहतील. तसेच केस गळतीची समस्याही कमी होईल.

(कोणतेही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;