Operation Sindoor- पाकिस्तानात एकामागोमाग 12 शहरांत स्फोट, लाहोर-कराचीमध्ये प्रचंड घबराट; अणुतळाजवळ पोहोचले ड्रोन
हिंदुस्थानकडून केलेल्या आॅपरेशन सिंदूरनंतर आता पाकिस्तानची चांगलीच तंतरली आहे. पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर तब्बल 16 दिवसात हिंदुस्थानने आॅपरेशन सिंदूर राबवले. याअंतर्गत हिंदुस्थानने पाकिस्तानच्या सीमेवरील दहशतवाद्यांचे 9 तळ उद्ध्वस्त केले. यामध्ये पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा कट रचण्यात आलेल्या जैश-ए-मोहम्मदच्या मुख्यालयाचाही समावेश आहे. या आॅपरेशननंतर पाकिस्तानला सध्याच्या घडीला पळता भुई थोडी झाली आहे.
आॅपरशेन सिंदूरनंतर आता सध्याच्या घडीला पाकिस्तानमध्ये, कमालीची घबराट पसरली आहे. पाकिस्तानातील लाहोरनंतर आता कराचीमध्येही स्फोट झाल्याचे वृत्त आहे. कराची ही पाकिस्तानची आर्थिक राजधानी मानली जाते. जिथे ड्रोनद्वारे स्फोट झाला. कराचीमधील स्फोटामुळे संपूर्ण पाकिस्तानात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. स्फोटानंतर संपूर्ण परिसर सील करण्यात आला आहे. पाकिस्तानी माध्यमांनुसार, कराचीमध्ये ड्रोन स्फोट झाला आहे. ड्रोन स्फोटानंतर संपूर्ण परिसरात गोंधळाचे वातावरण आहे. लष्कराने या भागाचा ताबा घेतला आहे. पाकिस्तानचे सर्व अणुबॉम्ब फक्त कराचीमध्ये साठवले जातात. अशा परिस्थितीत कराचीमध्ये ज्या पद्धतीने ड्रोन स्फोट झाला त्यामुळे पाकिस्तानच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. कराची बॉम्बस्फोट हा सुरक्षेतील एक मोठी उलथापालथ मानला जात आहे.
पाकिस्तानातील कराची, गुजरांवाला, लाहोर, चकवाल आणि घोटकी येथे ड्रोन हल्ले झाले आहेत. ड्रोन हल्ल्यामुळे या भागात आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली आहे. हे ड्रोन कुठून आले याबद्दल पाकिस्तानने अद्याप काहीही सांगितलेले नाही. तसेच ड्रोन हल्ल्याची जबाबदारी कोणीही घेतलेली नाही. या 5 शहरांव्यतिरिक्त, उमरकोटमध्येही ड्रोन स्फोट झाल्याचे वृत्त आहे. सध्याच्या घडीला लाहोरमध्ये सर्वाधिक 3 ड्रोन स्फोट झाले आहेत. पाकिस्तानी माध्यमांनुसार, पाकिस्तानमध्ये आतापर्यंत एकूण 12 स्फोट झाले आहेत. लाहोरमधील एका लष्करी तळाजवळ ड्रोन स्फोट झाल्याचे वृत्त आहे.
ड्रोन स्फोट रोखण्यात पाकिस्तानची हवाई संरक्षण प्रणाली पूर्णपणे अपयशी ठरल्याचे दिसून येते. विशेष म्हणजे, बुधवारी सभागृहात पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी पाकिस्तानी हवाई दलाचे खूप कौतुक केले होते. शाहबाज म्हणाले की, पाकिस्तानी हवाई दल खंबीरपणे मैदानात उभे आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List