पंजाब सीमेवरून घुसखोरी करण्याचा डाव उधळला, बीएसएफने पाकिस्तानी नागरिकाला गोळ्या घातल्या
पहलगाम हल्ल्याचा बदला घेत मंगळवारी हिंदुस्थानी सैन्याने पाकिस्तानमध्ये घुसून कारवाई करत दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले. यामुळे हिंदुस्थान आणि पाकिस्तानमधील तणाव शिगेला पोहोचला आहे. अशातच पंजाबच्या फिरोजपूर सेक्टरमध्ये आंतरराष्ट्री सीमेवर घुसखोरीचा प्रयत्न बीएसएफने उधळून लावला आहे. बीएसएफने घुसखोरी करणाऱ्या पाकिस्तानी नागरिकाला गोळ्या घालून ठार मारले.
पाकिस्तानी घुसखोर आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडून अंधाराचा फायदा घेत सुरक्षा कुंपणाकडे जाताना दिसला. बीएसएफच्या जवानांनी चेतावणी दिल्यानंतरही तो माणूस पुढे जात होता. त्यामुळे बीएसएफ जवानांनी घुसखोराला गोळ्या घातल्या. बीएसएफने अधिकृत याबाबत माहिती दिली आहे.
तत्पूर्वी याच आठवड्याच्या सुरुवातीला बीएसएफने पंजाबच्या गुरुदासपूर जिल्ह्यात एका पाकिस्तानी नागरिकाला हिंदुस्थानच्या हद्दीत घुसण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपांखाली अटक केली होती. मोहम्मद हुसेन असे आरोपीचे नाव असून बीएसएफने त्याला पंजाब पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. त्याच्याकडून पाकिस्तानी चलन आणि ओळखपत्रही जप्त केले आहे.
त्याआधी राजस्थानमध्ये सीमा ओलांडण्याचा प्रयत्न करणाऱ्या पाकिस्तानी सैनिकालाही अटक करण्यात आली होती. हेरगिरीच्या हेतूने या सैनिकाने हिंदुस्थानच्या सीमेत घुसण्याचा प्रयत्न केला असा असा प्राथमिक अंदाज आहे. बीएसएफकडून त्याची कसून चौकशी सुरू आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List