पहलगाम हल्ल्याप्रकरणी शिवसेना आक्रमक; पाकिस्तानचा झेंडा जाळला, अंत्ययात्रा काढून केला निषेध

पहलगाम हल्ल्याप्रकरणी शिवसेना आक्रमक; पाकिस्तानचा झेंडा जाळला, अंत्ययात्रा काढून केला निषेध

जम्मू काश्मीर येथील पहेलगाममध्ये जिहादी दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) वतीने जिल्हा संपर्क प्रमुख अनिल कोकीळ यांच्या मार्गदर्शनाखाली पाकिस्तानचा झेंडा जाळत अंत्ययात्रा काढून तीव्र निषेध नोंदवण्यात आला. पहलगाम प्रकरणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.

प्रारंभी धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज चौकात जमून शिवसैनिकांनी पाकिस्तानचा निषेध करत घोषणा दिल्या. गिन गिन के है बदला लेना जननी के अपमान का, नकसे परसे नाम मिटादो पापी पाकिस्तान का, भारतमाता की जय, वंदे मातरम्, जिसको चाहिये पाकिस्तान, उसको भेजो कब्रस्तान अशा घोषणा यावेळी देण्यात येत होत्या. यावेळी शिवसैनिकांनी पाकिस्तानचा झेंड्याला चपलेचा हार घातलेले फलक हाती धरले होते.

यावेळी पुरुषोत्तम बरडे म्हणाले, जिहादी दहशतवाद्यांनी जम्मू कश्मीरमध्ये गेलेल्या हिंदूंना त्यांचा धर्म विचारून गोळ्या घातल्या हे निषेधार्ह आहे. भारताने त्वरित अशा दहशतवाद्यांवर अत्यंत कठोर कारवाई करून पाकिस्तानात घुसून संबंधितांना ठार मारले पाहिजे. तसेच भारतात राहून या दहशतवाद्यांना मदत करणाऱ्यांनाही तत्काळ संपवले पाहिजे. आगामी काळात बिहारच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा हल्ला झाल्याने हा हल्ला राजकीय हेतूने प्रेरित आहे का अशीही शंका येत आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यात खरोखर हिम्मत असेल तर त्यांनी पाकिस्तानला त्वरित धडा शिकवावा.

यावेळी शिवसेनेतर्फे धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज चौक ते छत्रपती श्री शिवाजी महाराज चौकापर्यंत पाकिस्तानचा झेंडा गुंडाळलेली तिरडी घेऊन अंतयात्रा काढण्यात आली. तसेच या तिरडीचे दहन छत्रपती श्री शिवाजी महाराज चौकात करण्यात आले.

याप्रसंगी पुरुषोत्तम बरडे, दत्तात्रय वानकर, ज्ञानेश्वर सपाटे, महेश धाराशिवकर, आशुतोष बरडे, सुरेश जगताप, विजय पुकाळे, दिनकर जगदाळे, तुषार खंदारे, प्रसन्न नाजरे, धनराज जानकर, रेवण पुराणिक, लहू गायकवाड, योगेश क्षीरसागर, सचिन सुरवसे, रविकांत गायकवाड, कृष्णा सुरवसे, बाळासाहेब माने, नाना मोरे, गजेंद्र माशाळ, शिवा कोळी, प्रशांत कदम, संभाजी कोडगे, रोहित सुरवसे, राहुल परदेशी, अण्णा गवळी, महेश गवळी, अजय अमनूर, विष्णुदास जवंजाळ, गणेश खानापुरे, संदीप भोसले, ओंकार सुतार, पंकज रणदिवे, लक्ष्मण शिंदे आदीसह बहुसंख्येने शिवसैनिक व हिंदुत्ववादी युवकांची उपस्थिती होती.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

‘ऑपरेशन सिंदूर’चं टायटल मिळवण्यासाठी निर्मात्यांमध्ये चढाओढ ‘ऑपरेशन सिंदूर’चं टायटल मिळवण्यासाठी निर्मात्यांमध्ये चढाओढ
देशात एखादी मोठी घटना घडली की त्यावर काही महिन्यांनी किंवा वर्षांनी चित्रपट बनवला जातो. पण त्याआधी त्या घटनेच्या नावावर शिक्कामोर्तब...
Operation Sindoor – पाकिस्तानातील अमेरिकन नागरिक आणि दूतावासातील अधिकाऱ्यांना सरकारने दिले देश सोडण्याचे निर्देश
…तोपर्यंत बदला पूर्ण होणार नाही! सर्वपक्षीय बैठकीत शिवसेनेने मांडली भूमिका, संजय राऊत यांचे ट्विट
Operation Sindoor – बिथरलेल्या पाकिस्तानचा हिंदुस्थानवर हल्ल्याचा प्रयत्न हाणून पाडला, पाकड्यांच्या ड्रोन अन् क्षेपणास्त्रांच्या चिंधड्या
Operation Sindoor- पाकिस्तानकडून लष्करी हल्ला झाल्यास त्याला कठोर उत्तर मिळेल- परराष्ट्रमंत्री एस जयशंकर
पंजाब सीमेवरून घुसखोरी करण्याचा डाव उधळला, बीएसएफने पाकिस्तानी नागरिकाला गोळ्या घातल्या
Operation Sindoor हिंदुस्थानकडून पाकिस्तानला आणखी एक जबरदस्त हादरा; लाहोरमधील रडार केले उद्ध्वस्त